Lokman News
ताज्या बातम्या
"शब्द दिला, पाठपुरावा केला; 'कम्प्लिशन सर्टिफिकेट' मिळवून संस्थेचा विश्वास जपला!" 🏢📜 "वाढदिवसाचा मान, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्यदान!" 🎒📚 "दिंडीत भक्तीचा गजर, चिमुकल्या विठ्ठल-रखुमाईने जिंकली गावकऱ्यांची नजर!" 🙏🚩२४/०७/२०२६ "दिंडीतून समतेचा गजर, विठ्ठलभक्तीत उमटला ऐक्याचा स्वर!" 🙏🚩 "८२ वर्षांची उज्ज्वल परंपरा, संस्कार-शिक्षणाची सुवर्णगाथा!" "शब्द दिला, पाठपुरावा केला; 'कम्प्लिशन सर्टिफिकेट' मिळवून संस्थेचा विश्वास जपला!" 🏢📜 "वाढदिवसाचा मान, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्यदान!" 🎒📚 "दिंडीत भक्तीचा गजर, चिमुकल्या विठ्ठल-रखुमाईने जिंकली गावकऱ्यांची नजर!" 🙏🚩२४/०७/२०२६ "दिंडीतून समतेचा गजर, विठ्ठलभक्तीत उमटला ऐक्याचा स्वर!" 🙏🚩 "८२ वर्षांची उज्ज्वल परंपरा, संस्कार-शिक्षणाची सुवर्णगाथा!" "शब्द दिला, पाठपुरावा केला; 'कम्प्लिशन सर्टिफिकेट' मिळवून संस्थेचा विश्वास जपला!" 🏢📜 "वाढदिवसाचा मान, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्यदान!" 🎒📚 "दिंडीत भक्तीचा गजर, चिमुकल्या विठ्ठल-रखुमाईने जिंकली गावकऱ्यांची नजर!" 🙏🚩२४/०७/२०२६ "दिंडीतून समतेचा गजर, विठ्ठलभक्तीत उमटला ऐक्याचा स्वर!" 🙏🚩 "८२ वर्षांची उज्ज्वल परंपरा, संस्कार-शिक्षणाची सुवर्णगाथा!"
ताज्या बातम्या

कपिलेश्वर येथे स्वामी हंसानंद तीर्थ महाराजांचा २९ वा संन्यास दीक्षा वर्धापन दिन

लोकमन न्यूज..अनिल चौधरी १०/२/२०२६
कपिलेश्वर येथे स्वामी हंसानंद तीर्थ महाराजांचा २९ वा संन्यास दीक्षा वर्धापन दिन
लोकमन न्यूज..अनिल चौधरी मुडावद निंब (ता. अमळनेर) येथील श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर, तापी–पांझरा संगम येथे दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार) रोजी सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज गुरुवर्य यांच्या २९ व्या संन्यास दीक्षा वर्धापन दिनानिमित्त भव्य धार्मिक समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या पावन सोहळ्यासाठी भारतातील विविध भागांतून प्रमुख संत–महात्म्यांची उपस्थिती लाभणार असून, संतसंग, दर्शन व प्रवचनांचा लाभ भाविकांना मिळणार आहे. संतांच्या दर्शनाने व प्रवचन श्रवणाने संसारिक समस्या दूर होतात तसेच सुप्त पापांचा नाश होतो, असा भाविकांचा दृढ विश्वास आहे. या महान पुण्यपर्वाचा लाभ स्वतः घेऊन इतरांनाही घ्यावा, असे आवाहन श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट व स्वामी हंसानंद तीर्थ महाराज भक्त मंडळ, मुडावद निंब यांच्यावतीने करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अध्यात्मिक पर्वात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD