अमळनेर
अमळनेर (लोकमन न्यूज, अनिल चौधरी निंब):
महाराष्ट्र ही संतांची आणि महापुरुषांची भूमी आहे. या भूमीत अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचे महान कार्य क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. आज १० मार्च, सावित्रीमाईंचा स्मृतिदिन.
"माय सावित्री तू नसती तर शिकलो नसतो आम्ही..." अशा भावना व्यक्त करत आज त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात येत आहे. ज्या काळात स्त्रीला गुलामगिरीत जगावे लागत होते, त्या काळात सावित्रीमाईंनी शिक्षणाची कंबर कसली आणि समाजाला चिकित्सक विचार दिला. हंटर कमिशनसमोर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्याचा धाडसी प्रस्ताव मांडणाऱ्या सावित्रीमाईंमुळेच आजची स्त्री प्रगतीच्या शिखरावर आहे. केवळ शिक्षणच नव्हे, तर विज्ञानवादी दृष्टिकोन देऊन त्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या या अतुलनीय ऋणांचे स्मरण करत आज कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.
लेखन: एस.एच.भवरे (उपसंपादक, लेखन मंच साप्ताहिक) 

ज्ञानाची गंगा घराघरात पोहोचवणारी 'माय': सावित्रीबाई फुले स्मृतिदिन विशेष.
लोकमन न्यूज..अनिल चौधरी १०/३/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
