Lokman News Logo
ताज्या बातम्या
संकष्टी चतुर्थी विशेष: जळगावच्या पाळधीत विराजमान आहे 'भारतातील सर्वात मोठी' सिद्धी महागणपतीची मूर्ती!जळगाव: कुंदकेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह; रविवारी महाप्रसादाचे आयोजनप्रसिद्ध ऐराणी गायक गणेश अमृतकार यांना 'मराठी राजमुद्रा गौरव पुरस्कार' प्रदान!'कोण सुनेगा, किसको सुनाय...' : संकटे आणि मुजोर व्यवस्थेपुढे शेतकऱ्याचा मूक संयमदुर्मिळ 'पोवळा' साप पुन्हा नैसर्गिक अधिवासात; सर्पमित्र किशोर पाटील यांची कामगिरीसंकष्टी चतुर्थी विशेष: जळगावच्या पाळधीत विराजमान आहे 'भारतातील सर्वात मोठी' सिद्धी महागणपतीची मूर्ती!जळगाव: कुंदकेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह; रविवारी महाप्रसादाचे आयोजनप्रसिद्ध ऐराणी गायक गणेश अमृतकार यांना 'मराठी राजमुद्रा गौरव पुरस्कार' प्रदान!'कोण सुनेगा, किसको सुनाय...' : संकटे आणि मुजोर व्यवस्थेपुढे शेतकऱ्याचा मूक संयमदुर्मिळ 'पोवळा' साप पुन्हा नैसर्गिक अधिवासात; सर्पमित्र किशोर पाटील यांची कामगिरीसंकष्टी चतुर्थी विशेष: जळगावच्या पाळधीत विराजमान आहे 'भारतातील सर्वात मोठी' सिद्धी महागणपतीची मूर्ती!जळगाव: कुंदकेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह; रविवारी महाप्रसादाचे आयोजनप्रसिद्ध ऐराणी गायक गणेश अमृतकार यांना 'मराठी राजमुद्रा गौरव पुरस्कार' प्रदान!'कोण सुनेगा, किसको सुनाय...' : संकटे आणि मुजोर व्यवस्थेपुढे शेतकऱ्याचा मूक संयमदुर्मिळ 'पोवळा' साप पुन्हा नैसर्गिक अधिवासात; सर्पमित्र किशोर पाटील यांची कामगिरी
अमळनेर

नावेच आधार! शिरपूर–अमळनेर जोडणारा रस्ता मृत्यूचा मार्ग बनतोय

लोकमन न्यूज..अनिल चौधरी १४/२/२०२६
नावेच आधार! शिरपूर–अमळनेर जोडणारा रस्ता मृत्यूचा मार्ग बनतोय

अमळनेर/शिरपूर: ब्रिटिशकाळापासून केवळ कागदावरच अडकलेला, गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षेत असलेला तापी नदीवरील नीम-मांजरीद पूल व रस्ता आजही केवळ एक स्वप्नच आहे. शिरपूर आणि अमळनेर तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग पूल, रस्ता विना हजारो प्रवाशांना दररोज मृत्यूच्या दाढेतून प्रवास करावा लागत आहे, तर राजकीय आश्वासनांच्या पूर ओसरूनही पूल व रस्ता मात्र अजूनही कोरडाच आहे.

शिरपूर आणि अमळनेर तालुक्यांना जोडणारा, तापी नदीवरील नीम-मांजरीद पूल व रस्ता आज एक गंभीर समस्येचे केंद्र बनला आहे. अनेक वर्षांपासून नियोजित असलेला हा पूल व रस्ता अद्यापही कागदावरच असल्याने, या परिसरातील नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. 'लोकमन न्यूज'च्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत, या पुलाच्या अभावी निर्माण झालेल्या गंभीर समस्या उघडकीस आल्या आहेत.

प्रवाशांची जीवघेणी कसरत आणि पावसाळ्यातील भयावह वास्तव

दररोज सुमारे हजारांहून अधिक प्रवासी, ज्यात शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि रुग्ण यांचा समावेश आहे, या मार्गावरून प्रवास करतात. पूल नसल्यामुळे त्यांना नावेने किंवा धोकादायक मार्गाने नदी पार करावी लागते, ही एक जीवघेणी कसरत ठरते. विशेषतः पावसाळ्यात, जेव्हा तापी नदी दुथडी भरून वाहते, तेव्हा परिस्थिती आणखी भयावह बनते. नदीला पूर आल्यावर अनेकदा संपूर्ण दळणवळण ठप्प होते, ज्यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी पोहोचणे अत्यंत कठीण होते.

स्थानिक नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत असताना, एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी त्यांची मागणी आहे.

आश्वासनांचा पूर, कामाचा दुष्काळ: २५ वर्षांची प्रतीक्षा

हा पूल व रस्ता केवळ आजचा प्रश्न नाही, तर गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ तो केवळ निवडणुकीतील आश्वासनांचा आणि राजकीय नेत्यांच्या भाषणांचा एक भाग बनला आहे. ब्रिटिश कालावधीपासून नियोजित असलेला हा पूल व रस्ता स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही पूर्णत्वास आलेला नाही. प्रत्येक निवडणुकीत "पूल व रस्ता होणार, काम सुरू होणार" अशी घोषणाबाजी होते. मात्र, निवडणूक संपताच विषय थंडावला जातो.

कधी कच्ची खडी टाकून, तर कधी केवळ पाहणी करून जनतेची बोळवण केली जाते. लोकप्रतिनिधींच्या या पोकळ आश्वासनांमुळे आता जनतेचा संयम संपत चालला आहे. जनतेच्या भावनांशी खेळ करणाऱ्या या प्रकाराला आता लोकांनी कंटाळा आला आहे.

"दर निवडणुकीत पूल व रस्ता होणार, काम सुरू होणार अशी आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात मात्र काही ठिकाणी कच्ची खडी टाकून किंवा पाहणी करून विषय थंडावला जातो. जनता जनार्दनच्या भावनांशी खेळणाऱ्या या आश्वासनांचा आता लोकांना कंटाळा आला आहे."

आगामी निवडणुका आणि जनतेची अपेक्षा

आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरी लोकप्रतिनिधी आणि शासन याकडे गांभीर्याने पाहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेली अनेक दशके येथील नागरिकांनी धोका पत्करून प्रवास केला आहे, परंतु आता त्यांना केवळ आश्वासने नको आहेत, तर पुलाचे व रस्ता प्रत्यक्ष बांधकाम हवे आहे.'एका संतप्त नागरिकांची प्रतिक्रिया की जर निंब मांजरोद पुलाचे व रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन जर नेते मंडळी यांनी दिले नाही तर यापुढे जनता जनार्दन पुढच्या निवडणुकी ना बहिष्कार घातल्या शिवाय राहणार नाही

शिरपूर आणि अमळनेर तालुक्यांना सुरक्षित आणि कायमस्वरूपी दळणवळण देणारा तापी नदीवरील हा नीम-मांजरीद पूल व रस्ता कधी प्रत्यक्षात उतरणार, की नागरिकांना अजून किती काळ मृत्यूच्या सावलीतून प्रवास करावा लागणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. 'लोकमन न्यूज' या गंभीर समस्येवर प्रकाश टाकत असून, लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.......क्रमशः..

जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD