Lokman News Logo
ताज्या बातम्या
खडू सोडून हाती बॅट, जळगावात जमणार शिक्षकांचा थाट!अमळनेर: फार्मसी महाविद्यालयात वाचन चळवळीचा जागर.ग्रंथांचे पूजन आणि प्रदर्शन!सावधान! ही सामान्य उष्णता नाही, तर 'एल निनो'ची चाहूल; जी जीवघेणी ठरू शकते.शेतकरी बापाचे 'लोटांगण' हुंड्यासाठी नाही, तर 'मुलगी द्या' या विनवणीसाठी!'सुरुंग'ने प्रस्थापित साहित्याची तटबंदी फोडणारे कवी: त्र्यंबक सपकाळे यांना अभिवादन!खडू सोडून हाती बॅट, जळगावात जमणार शिक्षकांचा थाट!अमळनेर: फार्मसी महाविद्यालयात वाचन चळवळीचा जागर.ग्रंथांचे पूजन आणि प्रदर्शन!सावधान! ही सामान्य उष्णता नाही, तर 'एल निनो'ची चाहूल; जी जीवघेणी ठरू शकते.शेतकरी बापाचे 'लोटांगण' हुंड्यासाठी नाही, तर 'मुलगी द्या' या विनवणीसाठी!'सुरुंग'ने प्रस्थापित साहित्याची तटबंदी फोडणारे कवी: त्र्यंबक सपकाळे यांना अभिवादन!खडू सोडून हाती बॅट, जळगावात जमणार शिक्षकांचा थाट!अमळनेर: फार्मसी महाविद्यालयात वाचन चळवळीचा जागर.ग्रंथांचे पूजन आणि प्रदर्शन!सावधान! ही सामान्य उष्णता नाही, तर 'एल निनो'ची चाहूल; जी जीवघेणी ठरू शकते.शेतकरी बापाचे 'लोटांगण' हुंड्यासाठी नाही, तर 'मुलगी द्या' या विनवणीसाठी!'सुरुंग'ने प्रस्थापित साहित्याची तटबंदी फोडणारे कवी: त्र्यंबक सपकाळे यांना अभिवादन!
अमळनेर

सकल ज्ञान महोत्सवात ईश्वर महाजन यांना गुणवंत पत्रकार पुरस्कार

लोकमन न्यूज..अनिल चौधरी १६/२/२०२६
सकल ज्ञान महोत्सवात ईश्वर महाजन यांना गुणवंत पत्रकार पुरस्कार
लोकमन न्यूज़ अनिल चौधरी निंब अमळनेर. जळगाव;शिवरात्रीच्या पावन निमित्ताने मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था व जन्म प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षीस वितरण सोहळा २०२६” जळगाव येथील अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात व दिमाखात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात देवगाव-देवळी येथील माध्यमिक शिक्षक तथा अमळनेर तालुक्यात गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले ईश्वर रामदास महाजन यांना “गुणवंत पत्रकार पुरस्कार २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले. समाजहिताची जाण ठेवून निर्भीड व प्रामाणिक पत्रकारिता केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. जळगावच्या नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे यांच्या शुभहस्ते ईश्वर महाजन यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व मानाचा फेटा देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून डायट प्राचार्य निळकंठ आप्पा गायकवाड उपस्थित होते. तसेच आमदार राजू मामा भोळे, माजी महापौर जयश्रीताई महाजन, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्रीताई भंगाळे, गटशिक्षणाधिकारी विजय पवार, विधीतज्ञ अॅड. निखिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योतीताई राणे यांनी केले तर प्रस्ताविक किशोर पाटील यांनी मांडले. ज्ञान, समाजकार्य व पत्रकारितेचा संगम साधणारा हा सोहळा जळगाव शहरासाठी प्रेरणादायी ठरला.
जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD