Lokman News

राजकारण

कंत्राट वाटपात नातेसंबंधांचा खेळ; मनसे म्हणे, आता चौकशीची आलीय वेळ!
राजकारण
२ जून, २०२६

कंत्राट वाटपात नातेसंबंधांचा खेळ; मनसे म्हणे, आता चौकशीची आलीय वेळ!

जळगाव (प्रतिनिधी लोकमन न्यूज): जळगाव:जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) सध्या सुरू असलेला कथित भ्रष्टाचार, लाचखोरी, अधिकार्‍यांच्या नातेवाइकांना दिली जाणारी शासकीय कंत्राटे आणि हितसंबंधांच्या संघर्षाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) थेट जिल्हाधिकारी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीश किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी, या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकार्‍यांना एक सविस्तर निवेदन सादर केले. चौकशी न झाल्यास बेरोजगार युवकांच्या हक्कासाठी तीव्र जनआंदोलन छेडण्याचा कडक इशाराही यावेळी देण्यात आला. केवळ एका अधिकार्‍यावर कारवाई पुरेसी नाही नुकत्याच समोर आलेल्या लाचखोरीच्या प्रकरणाचा उल्लेख करत मनसेने निवेदनात म्हटले आहे की, केवळ एका अधिकार्‍यावर कारवाई करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये. या लाचखोरीच्या मागे एक मोठी साखळी कार्यरत असून, संबंधित अधिकारी, मध्यस्थ, कंत्राटदार आणि त्याचे लाभार्थी यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. शासकीय कामांमध्ये पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव असून, काही अधिकार्‍यांच्या संगनमतानेच हा गैरप्रकार वाढल्याचा आरोप मनसेने केला आहे. नातेवाइकांना कंत्राटांची खैरात; हितसंबंधांचा संघर्ष काही अधिकार्‍यांच्या मुलगा, सून, नातेवाईक अथवा निकटवर्तीयांच्या नावावर शासकीय कंत्राटे मिळवून दिली जात असल्याची धक्कादायक चर्चा सध्या विभागात सुरू आहे. स्वतःच्या पदाचा गैरवापर करून कुटुंबाला आर्थिक लाभ मिळवून देणे, हा गंभीर स्वरूपाचा 'हितसंबंधांचा संघर्ष' (Conflict of Interest) आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत मंजूर झालेल्या सर्व कंत्राटांचे स्वतंत्र 'ऑडिट' (लेखापरीक्षण) करावे आणि अधिकारी व कंत्राटदारांमधील नातेसंबंध व आर्थिक भागीदारी तपासावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. बेरोजगार युवकांच्या हक्कावर गदा "जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक रोजगार आणि व्यवसायाच्या संधींसाठी संघर्ष करत असताना, शासकीय कंत्राटे मात्र काही मोजक्याच लोकांच्या घशात घातली जात आहेत. शासकीय कंत्राटे ही कोणाची जहागीर नसून सर्व पात्र नागरिकांना त्यात समान संधी मिळाली पाहिजे," अशी आक्रमक भूमिका मनसेने मांडली. जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे तक्रार करण्याचे प्रशासनाचे आवाहन निवेदन स्वीकारताना निवासी जिल्हाधिकार्‍यांनी मनसेच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली. सार्वजनिक बांधकाम विभागातील या कथित गैरप्रकाराबाबत अधिकृत तक्रार 'जळगाव जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती'कडे सादर करण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच वस्तुनिष्ठ चौकशीसाठी उपलब्ध पुरावे व माहिती संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित हे निवेदन देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, पंकज चौधरी, भूषण ठाकूर, बादशहा शहा, अमजद खाटीक यांच्यासह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

"सुषमाताईंची लाट, मालुताईंची साथ; महिला शक्तीने गाजवला विजयाचा थाट!"
राजकारण
१ जून, २०२६

"सुषमाताईंची लाट, मालुताईंची साथ; महिला शक्तीने गाजवला विजयाचा थाट!"

(लोकमन न्यूज, निंब) अमळनेर : अमळनेर तालुका शेतकी सहकारी संघ निवडणूक २०२६ च्या चुरशीच्या निवडणुकीत आमदार श्री. दादासो. अनिल भाईदास पाटील यांच्या सहकार गटाने दणदणीत यश संपादन करत १५ पैकी १० जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेस पक्षाला ३ जागांवर आणि भारतीय जनता पक्षाला २ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत महिला मतदार संघातील निकाल विशेष चर्चेचा विषय ठरला. "दहिवदच्या सुषमाताई आणि झाडीच्या मालुबाई, शेतकरी संघात आता महिलांचीच नवलाई!" या उक्तीला साजेसा निकाल देत दहिवद येथील माजी सरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ. ताईसाहेब सुषमाताई वासुदेव देसले यांनी तब्बल ३२४६ मते मिळवत महिला मतदार संघात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य प्राप्त केले. तसेच झाडी येथील सौ. मालुताई यांनी २७८६ मते मिळवत विजयी झेंडा फडकावला. सौ. सुषमाताई देसले यांच्या या उल्लेखनीय यशामागे त्यांची जनसंपर्काची मजबूत पकड, सामाजिक कार्यातील सातत्य आणि सर्वसामान्य शेतकरी व महिलांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध महत्त्वाचे ठरल्याची चर्चा मतदारांमध्ये होत आहे. असे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचे योगदान असते; त्याचप्रमाणे एका यशस्वी स्त्रीच्या यशामागेही कुटुंबाचा व सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा असतो. सौ. सुषमाताई देसले यांच्या यशामागे त्र्यंबकेश्वर पेठ येथील शांत, संयमी, अभ्यासू व मुत्सद्दी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले डीवायएसपी श्री. अण्णासाहेब वासुदेव रामभाऊ देसले यांचेही मोठे योगदान असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. निवडणुकीतील निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र विजयी उमेदवारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी लोकमन न्यूजच्या प्रतिनिधींनी सौ. सुषमाताई देसले यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्य शहरात चकाचक रस्ते, उपनगरात मात्र मरण स्वस्त; मनसेच्या इशाऱ्याने आता PWD होणार व्यस्त!
राजकारण
३१ मे, २०२६

मुख्य शहरात चकाचक रस्ते, उपनगरात मात्र मरण स्वस्त; मनसेच्या इशाऱ्याने आता PWD होणार व्यस्त!

जळगाव: पिंप्राळा ते सावखेडा रस्त्यावरील सोनी नगर परिसरात रस्ता बांधून जवळपास एक वर्ष पूर्ण झाले असतानाही, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्या न भरल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या ठिकाणी वारंवार लहान-मोठे अपघात घडत असून दुचाकीस्वार, सायकलस्वार आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या या बेफिकीर कारभाराविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून तीव्र जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाच्या हेतूवर स्थानिक नागरिकांचे परखड प्रश्न सोनी नगर परिसर हा जळगाव महानगरपालिका हद्दीतील भाग असतानाही या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष का केले जात आहे, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर साईड पट्ट्या भरण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? वर्षभर उलटूनही हे काम अपूर्ण का ठेवण्यात आले? अनेक अपघात झाल्यानंतरही संबंधित यंत्रणा जागी का होत नाही? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. "शहरातील मुख्य भागांमध्ये रस्त्यांची कामे तातडीने पूर्णत्वास नेली जातात, मात्र उपनगरांतील भागांकडे नेहमीच दुय्यम नजरेने पाहिले जाते. नियमित घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर वसूल करणारे प्रशासन नागरिकांना सुरक्षित रस्ते का देऊ शकत नाही? मूलभूत सुविधांची मागणी करणे हा आमचा अधिकार आहे." — स्थानिक नागरिक, सोनी नगर रात्रीच्या वेळी मृत्यूचा सापळा! स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मुख्य रस्ता आणि रस्त्याच्या कडेची जमीन यामध्ये मोठी तफावत (खड्डा) निर्माण झाली आहे. अचानक समोरून वाहन आल्यास बाजूला होताना वाहनांचा तोल जाऊन अपघात होतात. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारामुळे हा धोका अधिक वाढतो. एखादा गंभीर अपघात घडून मोठी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे. १५ दिवसांत काम मार्गी लावा, अन्यथा मनसे स्टाईलने राडा: श्रीकृष्ण मेंगडे या गंभीर समस्येची दखल घेत मनसेचे उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) आणि संबंधित प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले की, "नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा प्रशासनासाठी दुसरे कोणते काम अधिक महत्त्वाचे आहे? सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तात्काळ दखल घेऊन येत्या १५ दिवसांत या साईड पट्ट्या भरून रस्ता सुरक्षित करावा. जर १५ दिवसांत हे काम मार्गी लागले नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रशासनाविरोधात तीव्र जनआंदोलन छेडेल आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांना पूर्णपणे प्रशासनच जबाबदार असेल." या इशाऱ्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तातडीने हालचाली करणार की मनसेच्या आंदोलनाचा सामना करणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा भोंगळ कारभार; गुणपत्रकावर 'Absent'चा बसला अजब मार!
राजकारण
३१ मे, २०२६

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा भोंगळ कारभार; गुणपत्रकावर 'Absent'चा बसला अजब मार!

(लोकमन न्यूज)जळगाव: कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (उमवि) परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. परीक्षा देऊनही गुणपत्रकात चक्क 'गैरहजर' (Absent) दाखवल्याचा धक्कादायक प्रकार TYBCA च्या विद्यार्थ्यांबाबत उघडकीस आला आहे. विद्यापीठाच्या या अक्षम्य चुकीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) याविरोधात आक्रमक पाऊल उचलले आहे. मनविसेच्या वतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक मा. श्री. योगेश पाटील यांना आज जळगाव येथे एक निवेदन देऊन तातडीने सुधारित निकाल जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. नेमका प्रकार काय? TYBCA च्या अनेक विद्यार्थ्यांनी सर्व पेपर वेळेत आणि प्रामाणिकपणे दिले होते. परीक्षा केंद्रावर हजेरी पटावर स्वाक्षरी देखील केली होती. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना विशिष्ट विषयांमध्ये 'Absent' दर्शवण्यात आले आहे. त्यामुळे वर्षभर मेहनत करूनही विद्यार्थ्यांच्या हाती 'अनुत्तीर्ण' (Fail) चा निकाल आला आहे. "आम्ही परीक्षा हॉलमध्ये उपस्थित होतो, उत्तरपत्रिकाही जमा केल्या. तरीही आम्हाला गैरहजर दाखवून नापास करण्यात आले आहे. यामुळे आमचे पुढील शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे." — एक त्रस्त विद्यार्थी मनविसेचा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांवर झालेल्या या अन्यायाची माहिती मिळताच मनविसेचे पदाधिकारी तातडीने हरकती घेऊन विद्यापीठात पोहोचले. परीक्षा संचालकांना निवेदन देताना मनविसे प्रतिनिधींनी विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. प्रमुख मागण्या: विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका आणि हजेरी पटाची तात्काळ पडताळणी करावी. तांत्रिक चूक दुरुस्त करून ४८ तासांच्या आत सुधारित निकाल जाहीर करावा. दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी. ...अन्यथा 'मनविसे' स्टाईलने आंदोलन! मनविसेच्या वतीने परीक्षा संचालकांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर प्रशासनाने यावर तात्काळ पडदा टाकून विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढले नाही, तर विद्यापीठात 'मनविसे' स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी पूर्णपणे विद्यापीठ प्रशासनाची असेल, असेही निवेदनात म्हटले आहे. आता यावर विद्यापीठ प्रशासन काय पावले उचलते आणि विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

"कॅशसाठी ग्राहकांना वणवण फिरवाल; तर मनसे स्टाईलने चांगलाच धडा शिकाल!"
राजकारण
२५ मे, २०२६

"कॅशसाठी ग्राहकांना वणवण फिरवाल; तर मनसे स्टाईलने चांगलाच धडा शिकाल!"

जळगाव (लोकमन न्यूज वृत्तसेवा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईची तीव्र परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वाहनधारक, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधन मिळवण्यासाठी नागरिकांना तब्बल ४ ते ५ तास रांगेत उभे राहावे लागत आहे. मात्र, एवढा वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही पेट्रोल पंप चालकांकडून ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्यास थेट नकार दिला जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर समस्येवर मनसेच्या शिष्टमंडळाने पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. 'डिजिटल इंडिया'च्या धोरणाला हरताळ! देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “डिजिटल इंडिया” आणि “कॅशलेस इंडिया” मोहिमेअंतर्गत नागरिकांना जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन केले आहे. शासन स्तरावर UPI, QR Code आणि ऑनलाईन बँकिंग यांसारख्या सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. मात्र, जळगाव जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक शासनाच्या या डिजिटल धोरणालाच हरताळ फासत असल्याचे चित्र आहे. तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतर अचानक “फक्त कॅश (रोख रक्कम) द्या” अशी अट पंप चालकांकडून घातली जाते. यामुळे ग्राहकांना इंधन सोडून पुन्हा एटीएम शोधण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. अनेकदा पैसे न मिळाल्यामुळे ग्राहकांना इंधन न घेताच मनस्ताप सहन करत रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. शेतकऱ्यांची अडवणूक; शेतीकामे ठप्प! दुसरीकडे, शेतकरी बांधवांनाही पेट्रोल पंप चालकांच्या मनमानी कारभाराचा मोठा फटका बसत आहे. शेतीसाठी लागणारे पाण्याचे पंप, जनरेटर, फवारणी यंत्रे आणि पॉवर टिलर यांसारखी अवजारे थेट पेट्रोल पंपावर आणणे शक्य नसते. असे असतानाही काही पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांना कॅन किंवा डब्यात पेट्रोल-डिझेल देण्यास साफ टाळाटाळ करत आहेत. यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांची शेतीकामे खोळंबली असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 📌 मनसेच्या प्रमुख ५ मागण्या: मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे खालील मागण्यांचे निवेदन सादर केले आहे: ऑनलाईन पेमेंटची सक्ती: जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर UPI, QR Code आणि कार्ड पेमेंट सक्तीने स्वीकारण्याबाबत स्पष्ट आदेश देण्यात यावेत. दोषी पंपांवर कारवाई: ऑनलाईन पेमेंट नाकारणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. विशेष नियंत्रण पथक: पेट्रोल-डिझेल टंचाईच्या काळात नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही, यासाठी प्रशासनाने विशेष नियंत्रण ठेवावे. शेतकऱ्यांना सवलत: शेतकरी बांधवांना त्यांच्या शेती अवजारांसाठी डब्यात/कॅनमध्ये इंधन देण्याबाबत सर्व पेट्रोल पंपांना स्पष्ट सूचना द्याव्यात. माहिती फलक लावणे: प्रत्येक पेट्रोल पंपावर “ऑनलाईन पेमेंट उपलब्ध आहे” असे फलक लावणे बंधनकारक करण्यात यावे. पुरवठा अधिकाऱ्यांचे तात्काळ कारवाईचे आश्वासन मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरिकांची आणि शेतकऱ्यांची होणारी अडवणूक खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत त्यांनी "या प्रकरणी मी तात्काळ कारवाईचे आदेशाचे पत्र काढतो" असे लेखी आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. 'हे' मनसे पदाधिकारी होते उपस्थित या आंदोलनाप्रसंगी मनसेचे उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ॲड. जमील देशपांडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी बिल, राहुल चव्हाण, राजेश मराठे, बादशहा शहा, अमजित खाटीक, दीपक राठोड, महेंद्र सपकाळे यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.: जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईची तीव्र परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वाहनधारक, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधन मिळवण्यासाठी नागरिकांना तब्बल ४ ते ५ तास रांगेत उभे राहावे लागत आहे. मात्र, एवढा वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही पेट्रोल पंप चालकांकडून ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्यास थेट नकार दिला जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर समस्येवर मनसेच्या शिष्टमंडळाने पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. 'डिजिटल इंडिया'च्या धोरणाला हरताळ! देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “डिजिटल इंडिया” आणि “कॅशलेस इंडिया” मोहिमेअंतर्गत नागरिकांना जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन केले आहे. शासन स्तरावर UPI, QR Code आणि ऑनलाईन बँकिंग यांसारख्या सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. मात्र, जळगाव जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक शासनाच्या या डिजिटल धोरणालाच हरताळ फासत असल्याचे चित्र आहे. तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतर अचानक “फक्त कॅश (रोख रक्कम) द्या” अशी अट पंप चालकांकडून घातली जाते. यामुळे ग्राहकांना इंधन सोडून पुन्हा एटीएम शोधण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. अनेकदा पैसे न मिळाल्यामुळे ग्राहकांना इंधन न घेताच मनस्ताप सहन करत रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. शेतकऱ्यांची अडवणूक; शेतीकामे ठप्प! दुसरीकडे, शेतकरी बांधवांनाही पेट्रोल पंप चालकांच्या मनमानी कारभाराचा मोठा फटका बसत आहे. शेतीसाठी लागणारे पाण्याचे पंप, जनरेटर, फवारणी यंत्रे आणि पॉवर टिलर यांसारखी अवजारे थेट पेट्रोल पंपावर आणणे शक्य नसते. असे असतानाही काही पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांना कॅन किंवा डब्यात पेट्रोल-डिझेल देण्यास साफ टाळाटाळ करत आहेत. यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांची शेतीकामे खोळंबली असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 📌 मनसेच्या प्रमुख ५ मागण्या: मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे खालील मागण्यांचे निवेदन सादर केले आहे: ऑनलाईन पेमेंटची सक्ती: जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर UPI, QR Code आणि कार्ड पेमेंट सक्तीने स्वीकारण्याबाबत स्पष्ट आदेश देण्यात यावेत. दोषी पंपांवर कारवाई: ऑनलाईन पेमेंट नाकारणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. विशेष नियंत्रण पथक: पेट्रोल-डिझेल टंचाईच्या काळात नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही, यासाठी प्रशासनाने विशेष नियंत्रण ठेवावे. शेतकऱ्यांना सवलत: शेतकरी बांधवांना त्यांच्या शेती अवजारांसाठी डब्यात/कॅनमध्ये इंधन देण्याबाबत सर्व पेट्रोल पंपांना स्पष्ट सूचना द्याव्यात. माहिती फलक लावणे: प्रत्येक पेट्रोल पंपावर “ऑनलाईन पेमेंट उपलब्ध आहे” असे फलक लावणे बंधनकारक करण्यात यावे. पुरवठा अधिकाऱ्यांचे तात्काळ कारवाईचे आश्वासन मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरिकांची आणि शेतकऱ्यांची होणारी अडवणूक खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत त्यांनी "या प्रकरणी मी तात्काळ कारवाईचे आदेशाचे पत्र काढतो" असे लेखी आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. 'हे' मनसे पदाधिकारी होते उपस्थित या आंदोलनाप्रसंगी मनसेचे उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ॲड. जमील देशपांडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी बिल, राहुल चव्हाण, राजेश मराठे, बादशहा शहा, अमजित खाटीक, दीपक राठोड, महेंद्र सपकाळे यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगावात सट्ट्याचा सुळसुळाट, मनसे करणार थेट 'खळ्ळ खट्याक'!
राजकारण
२२ मे, २०२६

जळगावात सट्ट्याचा सुळसुळाट, मनसे करणार थेट 'खळ्ळ खट्याक'!

लोकमन न्यूज नेटवर्क, निंब (जळगाव): जळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे आणि सट्टा बाजार येत्या १० दिवसांच्या आत पूर्णपणे बंद करण्यात यावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा मनसेच्या वतीने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या अवैध धंद्यांमुळे शहरातील शांतता धोक्यात आली असून तरुण पिढी उद्ध्वस्त होत असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे. पोलिसांच्या नाकाखाली सट्ट्याचे अड्डे; धक्कादायक ठिकाणे आली समोर पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात मनसेने शहरातील काही प्रमुख आणि धक्कादायक ठिकाणांचा थेट उल्लेख केला आहे, जिथे कोणतीही भीती न बाळगता उघडपणे सट्टा बाजार सुरू आहे: जिल्हा पेठ पोलीस हद्द: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटमध्ये चक्क शासकीय कार्यालयाच्या खालीच बिनधास्तपणे सट्टा चालवला जात आहे. तालुका पोलीस हद्द: गुजरात पेट्रोल पंप उड्डाणपुलाशेजारी बळकावलेल्या जागेवर आणि कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धिविनायक चौकात थेट 'ग्रीन शेड' उभारून बेकायदेशीर सट्टा सुरू आहे. रामानंद नगर पोलीस हद्द: रामानंद घाट नाल्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर सट्टा बाजार सुरू आहे. स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर संशयाची सुई "अतिशय गंभीर बाब म्हणजे हे सर्व अवैध धंदे शासकीय कार्यालयांच्या आणि पोलिसांच्या नाकाखाली सुरू आहेत. संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. पोलिसांच्या या सुस्त कारभारामुळेच गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे," असा थेट आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे. १० दिवसांचा 'अल्टिमेटम'; कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची मनसेने प्रशासनाला गांभीर्याने इशारा दिला आहे की, पुढील १० दिवसांत जर हे अवैध धंदे समूळ नष्ट झाले नाहीत, तर मनसे जळगाव शहरात त्रस्त नागरिकांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. या आंदोलनादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदन देताना 'हे' पदाधिकारी होते उपस्थित: हे निवेदन देतेवेळी मनसे उप महानगर अध्यक्ष राजेंद्र एस. निकम, श्रीकृष्ण मेंगडे (उपमहा नगराध्यक्ष, मनसे जळगाव शहर), ललित शर्मा, प्रकाश जोशी, अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे, विकास पाथरे, राजेश मराठे, इसुभ खाटीक, अजमल खाटीक, अली खाटीक, बादशहा खाटीक यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“एसटी स्टँडवर सुविधा ठप्प; मनसे म्हणते प्रशासन गप्प!
राजकारण
१८ मे, २०२६

“एसटी स्टँडवर सुविधा ठप्प; मनसे म्हणते प्रशासन गप्प!

एस टी स्टँडवरील उपाहारगृह तात्काळ सुरू करा; अन्यथा मनसेच प्रवाशांना चहा-नाश्ता देणार — मनसेचा इशारा (लोकमन न्यूज निंब | जळगाव प्रतिनिधी) जळगाव येथील एसटी बसस्थानक परिसरातील बंद असलेले उपाहारगृह तात्काळ सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगावतर्फे एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बसस्थानक परिसरात उपाहारगृह बंद असल्यामुळे प्रवाशांना सवलतीच्या दरात चहा-नाश्त्याची सुविधा मिळत नसून, त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील इतर बसस्थानकांवर ही सुविधा सुरू असताना जळगाव बसस्थानक मात्र अद्याप वंचित का ठेवण्यात आले आहे? असा सवालही मनसेने उपस्थित केला. उपाहारगृह सुरू करण्यासाठी आवश्यक जागा व सुविधा उपलब्ध असूनही प्रशासनाकडून होत असलेला विलंब संशयास्पद असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध जपले जात आहेत का? अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन विभाग नियंत्रकांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, जर लवकरात लवकर उपाहारगृह सुरू करण्याचा निर्णय झाला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः एसटी बसस्थानक परिसरात प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात चहा-नाश्त्याची व्यवस्था उपलब्ध करून देईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, चेतन पवार, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, संदीप मांडोळे, राहुल चव्हाण, राजेश मराठे, विकास पात्रे, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भिल्ल यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

गिरीशभाऊंच्या वाढदिनी विद्यार्थ्यांना ज्ञानाची भेट; जिजामाता विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप थेट!
राजकारण
१६ मे, २०२६

गिरीशभाऊंच्या वाढदिनी विद्यार्थ्यांना ज्ञानाची भेट; जिजामाता विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप थेट!

(प्रतिनिधी -किशोर पाटील लोकमन न्यूज.) जळगाव : जळगाव न्यू जागृती मित्र मंडळ संचलित जिजामाता माध्यमिक विद्यालय, हरी विठ्ठल नगर येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र आर. खोरखेडे यांनी प्रमुख पाहुणे प्रशांत जाधव (कामगार मोर्चा अध्यक्ष), उज्वलाताई बेंडाळे (नगरसेविका), कुमार शिवारामे (प्रदेश सचिव, कामगार मोर्चा) तसेच अतुल राजपूत (कार्यकारणी सदस्य) यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या वाढदिवस शुभेच्छा मंत्र म्हणून गिरीश महाजन यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड व खाऊ वाटप करण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. राजेंद्र आर. खोरखेडे यांनी मानले.

कांताई नेत्रालयाची समाजसेवा महान; फेसर्डीत ५२ रुग्णांची नेत्रतपासणी अभियान
राजकारण
१६ मे, २०२६

कांताई नेत्रालयाची समाजसेवा महान; फेसर्डीत ५२ रुग्णांची नेत्रतपासणी अभियान

(प्रतिनिधी : लोकमन न्यूज, निंब) जळगाव : ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत नेत्रतपासणी व योग्य उपचार मिळावेत या उद्देशाने जळगाव तालुक्यातील फेसर्डी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल ५२ नागरिकांनी मोतीबिंदू तपासणी करून घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या विशेष सहकार्यातून जिल्हा परिषद शाळा, फेसर्डी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील अनेक नागरिक आर्थिक अडचणी किंवा जागरूकतेच्या अभावामुळे नेत्रउपचारांपासून वंचित राहतात. अशा गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिरादरम्यान कांताई नेत्रालयाच्या तज्ज्ञ पथकाने नागरिकांची सखोल नेत्रतपासणी केली. तपासणीदरम्यान काही रुग्णांचा मोतीबिंदू प्रगत अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. अशा पात्र रुग्णांवर जळगाव येथील कांताई नेत्रालयात विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच शस्त्रक्रियेनंतर आवश्यक औषधोपचार व मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. मोतीबिंदू हा वाढत्या वयानुसार होणारा गंभीर नेत्रविकार मानला जातो. वेळेवर उपचार न झाल्यास दृष्टी कमी होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अशा मोफत तपासणी शिबिरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून अनेकांना नवदृष्टीची आशा निर्माण होत आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमिल देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, सरपंच भूषण पवार, शिवसेना युवा तालुकाध्यक्ष किरण पाटील, राजेंद्र पाटील, संदीप पाटील, रमेश पाटील, एकनाथ पाटील, कल्पना पाटील, सरला पाटील, उषा पाटील, बारकु पाटील तसेच कांताई नेत्रालयाचे अदनान शेख (ऑप्टोमेट्रिस्ट), योगेश माळी (कॅम्प को-ऑर्डिनेटर) आणि अभिमन्यू पाटील उपस्थित होते. शिबिरानंतर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांना पुढील उपचार, मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे फेसर्डी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

कर भरूनही पदरी फक्त खड्डे आणि धूळ, मनसे आता उखडणार अन्यायाचे मूळ!
राजकारण
८ मे, २०२६

कर भरूनही पदरी फक्त खड्डे आणि धूळ, मनसे आता उखडणार अन्यायाचे मूळ!

जळगाव: शहराचा विस्तार होत असताना औद्योगिक वसाहती जवळील सुप्रीम कॉलनी परिसरातील रस्त्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष पाहता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आक्रमक पवित्रा घेतला असून जन आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रमुख मुद्दे: अत्यंत बिकट अवस्था: सुप्रीम कॉलनी रिक्षा स्टॉप ते सागर अपार्टमेंट आणि कृष्णानगर मागील परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. केवळ खडीकरण: ७-८ वर्षांपूर्वी केवळ खडी टाकली होती, त्यानंतर डांबरीकरण झालेच नाही. नागरिकांचे हाल: पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुळीमुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनसेची मागणी: नियमित कर भरूनही मूलभूत सुविधा का मिळत नाहीत? असा सवाल करत तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. उपस्थिती: यावेळी मनसे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, अनिता कापुरे, लक्ष्मी भील, युसूफ खाटीक, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर यांसह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. रस्त्यांचे काम तातडीने न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. (लोकमन न्यूज निंब, जळगाव)

आमदारांची साथ, मंत्र्यांचा हात; सुटणार आता प्रलंबित प्रश्नांची गाठ!
राजकारण
७ मे, २०२६

आमदारांची साथ, मंत्र्यांचा हात; सुटणार आता प्रलंबित प्रश्नांची गाठ!

मुंबई: महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या दालनात महत्त्वाची बैठक पार पडली. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत निदेशकांच्या न्याय्य मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ठळक मुद्दे: मंत्र्यांचे आश्वासन: प्रलंबित मागण्यांवर निर्णयासाठी ८ दिवसांत विशेष बैठक बोलावणार. आमदारांची भूमिका: ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मागण्यांचा जोरदार पाठपुरावा करत तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली. उपस्थिती: संचालक सतीश सूर्यवंशी, सहसंचालक नितीन निकम, अनिल गावित व संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद पाटील, सरचिटणीस राजेश खडबडे उपस्थित होते. या सकारात्मक बैठकीमुळे राज्यातील आयटीआय निदेशकांमध्ये आनंदाचे आणि आशावादाचे वातावरण आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष, रहिवासी झाले दक्ष; नाल्याच्या रुंदीकरणाकडे कधी वळणार लक्ष?
राजकारण
६ मे, २०२६

प्रशासनाचे दुर्लक्ष, रहिवासी झाले दक्ष; नाल्याच्या रुंदीकरणाकडे कधी वळणार लक्ष?

(लोकमन न्यूज, निंब): जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील सोनिनगर येथील रहिवाशांना यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा जलमय संकटाचा सामना करावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे. या भागातील नाल्याला असलेल्या कृत्रिम अडथळ्यांमुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती आणि नाल्याच्या रुंदीकरणाचा प्रलंबित प्रश्न याकडे जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वारंवार तक्रार करूनही पालिका ढिम्म! सोनीनगर येथील रहिवासी श्रीकृष्ण तुकाराम मेंगडे यांच्यासह समस्त नागरिकांनी या गंभीर समस्येबाबत १२ फेब्रुवारी २०२६ रोजी महानगरपालिकेला लेखी निवेदन दिले होते. यापूर्वीही अनेकदा तोंडी व लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशासकीय पातळीवर या निवेदनांची साधी दखलही घेण्यात आलेली नाही. महापालिकेच्या बारनिशी विभागात तक्रार नोंदवूनही अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कचरा आणि थर्माकॉलचा अडथळा खेडेराव नगर आणि हुडको या मोठ्या परिसरातील संपूर्ण पावसाळी पाणी आणि सांडपाणी याच नाल्यातून वाहत येते. या पाण्यासोबत येणारा कचरा हा सोनीनगरवासीयांसाठी शाप ठरत आहे. परिसरातून वाहून येणारे चिकन आणि मच्छी विक्रेत्यांचे थर्माकॉलचे बॉक्स आणि इतर प्लास्टिक कचरा या नाल्यात अडकतो. नाल्याची रुंदी आणि उंची मुळातच कमी असल्याने हा कचरा तिथे साचून नाला पूर्णपणे तुंबतो. परिणामी, पावसाचे पाणी नाल्याबाहेर पडून थेट रहिवाशांच्या घरात शिरते. पावसाळ्यापूर्वी मार्ग काढण्याची विनंती सध्या मे महिना संपत आला असून पावसाळा तोंडावर आहे. जर पावसाळ्यापूर्वी या नाल्याची साफसफाई आणि रुंदीकरण झाले नाही, तर सोनीनगर परिसरात भीषण पूरपरिस्थिती निर्माण होऊन मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ शकते. "प्रशासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत न पाहता, पावसाळा सुरू होण्यापूर्वी या नाल्याचे काम युद्धपातळीवर मार्गी लावावे," अशी मागणी श्रीकृष्ण मेंगडे आणि सोनीनगरमधील रहिवाशांनी केली आहे. आता महापालिका प्रशासन या निवेदनावर प्रत्यक्ष कृती करणार की पावसाळ्यात अनर्थ घडण्याची वाट पाहणार? असा संतप्त सवाल जळगावकर विचारत आहेत. वृत्त संकलन: लोकमन न्यूज, निंब संपर्क: ९६६५४८०५५५ (श्रीकृष्ण मेंगडे)

"आरोपीला हालहाल करून संपवा!" – भोरच्या घटनेवर राज ठाकरे यांचा संताप, सरकारला विचारला जाब.
राजकारण
५ मे, २०२६

"आरोपीला हालहाल करून संपवा!" – भोरच्या घटनेवर राज ठाकरे यांचा संताप, सरकारला विचारला जाब.

येथे राज ठाकरे यांनी भोरमधील घटनेवर मांडलेल्या सडेतोड भूमिकेवर आधारित एक सविस्तर पण संक्षिप्त (Short) बातमी दिली आहे: "नराधमाला हालहाल करून संपवा!" – भोरच्या क्रूर घटनेवर राज ठाकरेंचा संताप; सरकारला विचारले बोचरे सवाल पुणे/मुंबई: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत, "कायदा काय सांगतो याचा विचार न करता त्या नराधमाला हालहाल करून संपवा," अशी संतप्त मागणी केली आहे. 'फास्टट्रॅक'ची व्याख्या सांगा! राज ठाकरे यांनी सरकारच्या 'फास्टट्रॅक' कारवाईच्या आश्वासनावर कडाडून टीका केली. "अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग का येते? सरकारने आधी फास्टट्रॅकची व्याख्या सांगावी, कारण राज्यात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वर्षागणिक वाढत आहे आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही," असे त्यांनी सडेतोडपणे मांडले. महाराष्ट्राचे 'लक्ष' आणि 'लक्ष्य' विचलित राज ठाकरे यांनी केवळ घटनेचा निषेध न करता, यामागच्या सामाजिक कारणांचेही विश्लेषण केले आहे: सत्तेचा भस्मासुर: राजकारण, उद्योग आणि अगदी साहित्यातही केवळ 'सत्ता' मिळवण्याची जी हाव निर्माण झाली आहे, त्याचेच विपरित प्रतिबिंब समाजात उमटत आहे. धाक नष्ट झाला: पूर्वी समाजाचा आणि मोठ्यांचा जो धाक असायचा, तो आता पूर्णपणे नष्ट झाला आहे. लोकांमध्ये समाजात 'छीथू' होईल ही भीती उरलेली नाही. उदारीकरणाचे वारे: १९९५ नंतर बदलेल्या मूल्यव्यवस्थेमुळे समाज अधिक व्यक्तिकेंद्रित आणि लालसाकेंद्रित झाला असून, ओटीटी कंटेंट आणि मोबाईलमधील गुंतवणुकीने सामाजिक घडी विस्कटली आहे. आंदोलकांवरील लाठीमाराचा निषेध या घटनेनंतर संताप व्यक्त करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचाही त्यांनी निषेध केला. "जी तत्परता पोलीस आंदोलकांवर दाखवतात, ती गुन्हेगारांच्या बाबतीत का दिसत नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निष्कर्ष: राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, त्यांचा पक्ष या सामाजिक बदलांसाठी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी पुढे असेल. विचलित झालेले महाराष्ट्राचे 'लक्ष्य' पुन्हा ताळ्यावर आणण्याची जबाबदारी सरकारने तातडीने पार पाडावी, असा इशाराही त्यांनी दिला....short batmi liha

"आरोग्याशी खेळ थांबवा, नाहीतर मनसेचा हिसका अनुभवा!"
राजकारण
३ मे, २०२६

"आरोग्याशी खेळ थांबवा, नाहीतर मनसेचा हिसका अनुभवा!"

जळगाव (लोकमन न्यूज): जळगाव शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्रभाग क्रमांक १८ मधील सुप्रीम कॉलनी परिसरातील नितीन साहित्या नगरमध्ये आज चक्क पिवळसर पाण्याचा पुरवठा करण्यात आला. ऐन उन्हाळ्यात शुद्ध पाणी मिळण्याऐवजी दूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्वच्छतेचा 'देखावा' आणि वास्तवाचा 'धक्का' गेल्या काही दिवसांपासून जळगावचे महापौर, उपमहापौर आणि काही नगरसेवक स्वतः पाण्याच्या टाक्यांमध्ये उतरून गाळ साफ करत असल्याचे फोटो समाजमाध्यमांवर फिरत आहेत. प्रशासन शहराला शुद्ध पाणी देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, नितीन साहित्या नगरातील पिवळसर पाणीपुरवठ्याने प्रशासनाचे हे सर्व दावे फोल ठरवले आहेत. "एकीकडे टाक्या स्वच्छतेचा देखावा करायचा आणि दुसरीकडे जनतेला दूषित पाणी पाजायचे, असा हा दुटप्पी कारभार सुरू आहे," अशी टीका रहिवाशांकडून होत आहे. आरोग्याशी खेळ; मनसे आक्रमक या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यांनी म्हटले की, "नितीन साहित्या नगरात पुरवले जाणारे पिवळसर पाणी म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडण्याचा प्रकार आहे. दूषित पाण्यामुळे परिसरात कावीळ, गॅस्ट्रो यांसारखे जलजन्य आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. लहान मुले आणि वृद्धांच्या जीविताला यामुळे धोका निर्माण झाला आहे."

४४ अंशांचा पारा आणि माणुसकीचा झरा; मनसेकडून स्वच्छता दूतांचा सन्मान खरा!
राजकारण
२ मे, २०२६

४४ अंशांचा पारा आणि माणुसकीचा झरा; मनसेकडून स्वच्छता दूतांचा सन्मान खरा!

जळगाव (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण खान्देशात उन्हाचा तडाखा वाढला असून जळगावचा पारा ४४ अंशांच्या पार गेला आहे. अशा रणरणत्या उन्हातही आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. निमित्त होते १ मे 'आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे'. या दिनाचे औचित्य साधून मनसे पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुलाबाचे फूल आणि गार पाण्याची बाटली देऊन सन्मान केला. केवळ कामगार दिनच नव्हे, वर्षभर सन्मान व्हावा या उपक्रमावेळी मनसेच्या वतीने स्पष्ट भूमिका मांडण्यात आली की, स्वच्छता कर्मचारी हे खऱ्या अर्थाने समाजाच्या आरोग्याचे रक्षक आहेत. कडाक्याची थंडी असो किंवा रणरणते ऊन, हे कर्मचारी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांचा सन्मान केवळ कामगार दिनापुरता मर्यादित न राहता, तो वर्षभर जोपासला गेला पाहिजे. त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रत्येक नागरिकाने त्यांच्याप्रती आदराची भावना ठेवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मान्यवरांची उपस्थिती आणि नियोजन या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन मनसेचे उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी केले होते. कार्यक्रमाला मनसेचे ज्येष्ठ नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, पंकज चौधरी, विकास पात्रे, जयेश मराठे, शुभम भावसार यांच्यासह मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माणुसकीचा गारवा ४४ अंश तापमानात काम करताना तहानलेल्या कर्मचाऱ्यांना गार पाण्याची बाटली मिळाल्याने आणि त्यांच्या कष्टाची दखल घेतल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव पाहायला मिळाले. मनसेच्या या 'माणुसकीच्या गारव्या'चे जळगाव शहरात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शेवटी, उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम ठोकून कार्यक्रमाची सांगता केली.

"महापौरांच्या पतीचा वाढलाय 'टेरर', मनसे दाखवणार प्रशासनाला 'मिरर'!"
राजकारण
३० एप्रि, २०२६

"महापौरांच्या पतीचा वाढलाय 'टेरर', मनसे दाखवणार प्रशासनाला 'मिरर'!"

(लोकमन न्यूज, निंब) जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या कारभारात महापौरांच्या पतीचा अनधिकृत हस्तक्षेप वाढल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाविरुद्ध रान पेटवले आहे. निवडून न आलेल्या व्यक्तीकडून लोकशाहीची पायमल्ली होत असून, प्रशासकीय शिस्त धोक्यात आली आहे. या प्रवृत्तीचा निषेध करत मनसेच्या शिष्टमंडळाने आज महानगरपालिका आयुक्तांना घेराव घालून लेखी तक्रार सादर केली. नेमके प्रकरण काय? जळगाव महापालिकेत सध्या महापौरांच्या पतीचा समांतर कारभार सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मनसेच्या तक्रारीनुसार, महापौरांचे पती महानगरपालिकेच्या अधिकृत दालनात बसून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देतात, कामांचे आदेश सोडतात आणि विकासकामांच्या बैठकीतही प्रत्यक्ष सहभाग नोंदवतात. इतकेच नव्हे तर, महापौरांच्या नावाखाली अनेक निवेदने आणि पत्रव्यवहारही त्यांच्याकडून हाताळले जात असल्याचे मनसेने म्हटले आहे. प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियमानुसार, निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही खासगी व्यक्तीला प्रशासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. मनसेचे शहराध्यक्ष विनोद शिंदे यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, "लोकशाहीत जनतेने महापौरांना निवडून दिले आहे, त्यांच्या पतीला नाही. अधिकाऱ्यांनी अशा अनधिकृत व्यक्तींचे आदेश पाळणे म्हणजे कायद्याचा भंग आहे. यामुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण होत असून पालिकेचा पारदर्शक कारभार धोक्यात आला आहे." आंदोलनाचा इशारा मनसेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून महापौरांच्या पतीला महापालिकेच्या कामकाजातून दूर ठेवावे. जर हा हस्तक्षेप थांबला नाही, तर मनसे स्टाईलने महानगरपालिकेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा गर्भित इशारा यावेळी देण्यात आला. यांची लाभली उपस्थिती या आंदोलनात आणि निवेदन देताना मनसेचे शहराध्यक्ष विनोद शंकर शिंदे, उपशहर अध्यक्ष आशुतोष जाधव, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, संदीप मांडोळे, खुशाल ठाकूर, जयेश मराठे, योगेश पाटील, पवन सपकाळे यांच्यासह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. वृत्त सौजन्य: श्रीकृष्ण मेंगडे उप महानगराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव शहर.

उन्हाचा वाढला तडाखा, सिग्नल बंदचा मनसेचा धडाका!
राजकारण
२९ एप्रि, २०२६

उन्हाचा वाढला तडाखा, सिग्नल बंदचा मनसेचा धडाका!

जळगाव: शहरात उन्हाचा पारा चाळीशी पार गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. या तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका दुचाकीस्वारांना बसत असून, सिग्नलवर थांबावे लागल्याने नागरिकांना चक्कर येणे व अस्वस्थ वाटण्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील वाहतूक सिग्नल सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याची मागणी केली आहे. प्रमुख मागण्या आणि घडामोडी: सिग्नलची वेळ: सकाळी ऊन वाढेपर्यंत ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील प्रमुख सिग्नल बंद ठेवावेत. पर्यायी व्यवस्था: सिग्नल बंद असताना वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून महत्त्वाच्या चौकांमध्ये पोलीस कर्मचारी तैनात करावेत. प्रशासनाची भूमिका: वाहतूक पोलीस निरीक्षकांनी मनसेच्या या निवेदनाची तातडीने दखल घेत, याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. "भरउन्हात सिग्नलवर ताटकळत उभे राहिल्याने वाहनधारकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाने मानवीय दृष्टिकोनातून हा निर्णय त्वरित अमलात आणावा." — श्रीकृष्ण मेंगडे (उपमहानगराध्यक्ष, मनसे) यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे जळगावकर प्रवाशांना वाढत्या उष्णतेपासून मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

“मी मराठी बोलतो, माझ्या रिक्षात बसा!”भुसावळात मनसे कडाडली: ‘मराठीच बोला, मराठीच वापरा!’
राजकारण
२८ एप्रि, २०२६

“मी मराठी बोलतो, माझ्या रिक्षात बसा!”भुसावळात मनसे कडाडली: ‘मराठीच बोला, मराठीच वापरा!’

भुसावळ (लोकमन न्यूज ,निंब): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज भुसावळ शहरात 'मराठी अभियान' मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. "मी मराठी बोलतो, मला मराठी समजते... या माझ्या रिक्षात बसा!" असे ठळक संदेश देणारे पोस्टर्स शहरातील रिक्षांवर लावून मराठी भाषेचा गौरव करण्यात आला. अभियानाचे मुख्य कारण: महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील सर्व रिक्षा, टॅक्सी आणि ओला-उबेर चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आले आहे. १ मे (महाराष्ट्र दिन) पासून या नियमाची कडक अंमलबजावणी होणार असून, प्रादेशिक परिवहन विभागातर्फे (RTO) याची तपासणी केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने भुसावळमध्ये हे जनजागृती अभियान हाती घेतले. प्रमुख ठळक मुद्दे: रिक्षाचालकांचा प्रतिसाद: शहरातील रिक्षाचालकांनी या मोहिमेचे स्वागत केले असून, अनेक चालकांनी स्वतःहून आपल्या वाहनांवर मराठी अस्मितेचे पोस्टर्स लावून घेतले. शासनाचा निर्णय: नवीन नियमानुसार, ज्या चालकांना मराठीचे मूलभूत ज्ञान नाही, त्यांचे परवाने धोक्यात येऊ शकतात. प्रवाशांशी संवाद सुलभ व्हावा हा यामागचा उद्देश आहे. मनसेची भूमिका: राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी संस्कृती आणि भाषेचा सन्मान राखण्यासाठी मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. कोणाचे लाभले मार्गदर्शन? हे अभियान मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांच्या सूचनेनुसार पार पडले. याप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, तालुका शहराध्यक्ष दीपक कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमामुळे केवळ शासकीय नियमांची पूर्तता होणार नसून, स्थानिक पातळीवर मराठी भाषेचा वापर आणि आदर वाढण्यास मदत होईल, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह! नवनिर्वाचित संपर्क अध्यक्ष संदीप पाचंगे आणि आशिष साबळे जळगाव दौऱ्यावर
राजकारण
२३ एप्रि, २०२६

मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह! नवनिर्वाचित संपर्क अध्यक्ष संदीप पाचंगे आणि आशिष साबळे जळगाव दौऱ्यावर

(लोकमन न्यूज, निंब प्रतिनिधी): जळगाव:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्वाचित जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष संदीप पाचंगे (मुंबई) व आशिष साबळे (पुणे) हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या दौऱ्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. असे आहे दौऱ्याचे नियोजन: जळगाव लोकसभा बैठक: २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता, पद्मालय विश्रामगृह, नेहरू चौक, जळगाव येथे पार पडेल. रावेर लोकसभा बैठक: २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता, हॉटेल प्रीमियर, जामनेर रोड, भुसावळ येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकांमध्ये संघटन बळकटीकरण, आगामी राजकीय रणनीती आणि स्थानिक जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. नवनियुक्त नेत्यांच्या आगमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, या बैठकीस सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी केले आहे.

जळगावच्या विकासाला ३८० कोटींचा ‘बूस्टर डोस’; शहराचा कायापालट होणार
राजकारण
३ फेब्रु, २०२६

जळगावच्या विकासाला ३८० कोटींचा ‘बूस्टर डोस’; शहराचा कायापालट होणार

जळगावच्या विकासाला ३८० कोटींचा ‘बूस्टर डोस’; शहराचा कायापालट होणार जळगाव शहराच्या पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारने ३८० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज या निधीबाबत माहिती दिली असून, यामुळे शहराच्या रखडलेल्या विकासकामांना मोठी गती मिळणार आहे. कुठे खर्च होणार निधी? या निधीतील मोठा हिस्सा शहरातील मुख्य रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, अमृत पाणीपुरवठा योजनेचे उर्वरित काम आणि ड्रेनेज लाईनच्या दुरुस्तीसाठी वापरला जाणार आहे. नगरपालिका निवडणुकीनंतरचा निर्णय: नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर नवीन महापौरांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर हा निधी जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळातही या निर्णयाचे स्वागत होत आहे.

जळगाव महापालिकेत महायुतीचा झेंडा; महापौरपदी सौ. दिपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण
२ फेब्रु, २०२६

जळगाव महापालिकेत महायुतीचा झेंडा; महापौरपदी सौ. दिपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या दैदिप्यमान विजयानंतर आज भाजपा शिवसेना महायुतीच्या वतीने भाजपा नेते नामदार गिरीषभाऊ महाजन व शिवसेना नेते, पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापौर पदासाठी सौ.दिपमाला काळे व शिवसेनेच्या वतीने उपमहापौर पदासाठी श्री.मनोज चौधरी यांचे उमेदवारी अर्ज आज महानगरपालिका कार्यालयात सादर करण्यात आले. यावेळी जळगावचे आमदार श्री.राजुमामा भोळे यांच्यासह महायुतीचे गटनेते, नगरसेवक उपस्थित होते. तत्पूर्वी जी.एम.फाउंडेशन येथे ना.गिरीषभाऊ महाजन व ना.गुलाबरावजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक व संघटना पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत दोन्ही नावांची घोषणा करण्यात आली व त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

“विकासाला गती देणारा आर्थसंकल्प 2026-27 सादर”
राजकारण
१ फेब्रु, २०२६

“विकासाला गती देणारा आर्थसंकल्प 2026-27 सादर”

“विकासाला गती देणारा आर्थसंकल्प 2026-27 सादर”

सुप्रीम कोर्टने UGC-च्या 2026 चे नवीन समता/इक्विटी नियम तात्पुरते थांबवले — दुरुपयोग होण्याची शक्यता.
राजकारण
३१ जाने, २०२६

सुप्रीम कोर्टने UGC-च्या 2026 चे नवीन समता/इक्विटी नियम तात्पुरते थांबवले — दुरुपयोग होण्याची शक्यता.

सुप्रीम कोर्टने UGC-च्या 2026 चे नवीन समता/इक्विटी नियम तात्पुरते थांबवले — दुरुपयोग होण्याची शक्यता.

 ग्रामपंचायतींना प्रशासक; निवडणुका सहा महिने लांबणीवर
राजकारण
३० जाने, २०२६

ग्रामपंचायतींना प्रशासक; निवडणुका सहा महिने लांबणीवर

ग्रामपंचायतींना प्रशासक; निवडणुका सहा महिने लांबणीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पेच दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आरक्षणाच्या वादामुळे आधीच रखडल्या असताना, आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवरही अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. राज्यातील मुदत संपणाऱ्या तब्बल १४,२३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या असून, या ग्रामपंचायतींचा कारभार आता प्रशासकांच्या हाती जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर न झाल्याने आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातील कायदेशीर प्रक्रियेमुळे ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रखडली आहे. परिणामी, लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्याने गावपातळीवरील लोकशाही व्यवस्थेला मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायती या ग्रामीण भागातील सर्वात महत्त्वाच्या आणि थेट लोकांशी जोडलेल्या संस्था मानल्या जातात. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर निर्णय घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर असते. मात्र, आता प्रशासकांच्या माध्यमातून कारभार चालवावा लागणार असल्याने स्थानिक निर्णयप्रक्रियेवर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त होत

मनपा मध्ये नगरसेवक पदी निवडलेल्या समाज बंधू - भगिनी यांचे सानंद साभिमान अभिनंदन !👌🏻👍🏻💪🏻🌹💐
राजकारण
१८ जाने, २०२६

मनपा मध्ये नगरसेवक पदी निवडलेल्या समाज बंधू - भगिनी यांचे सानंद साभिमान अभिनंदन !👌🏻👍🏻💪🏻🌹💐

मनपा मध्ये नगरसेवक पदी निवडलेल्या समाज बंधू - भगिनी यांचे सानंद साभिमान अभिनंदन !👌🏻👍🏻💪🏻🌹💐

राज आणि उद्धव ठाकरे एकाच केंद्रावर समोरासमोर; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
राजकारण
१५ जाने, २०२६

राज आणि उद्धव ठाकरे एकाच केंद्रावर समोरासमोर; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

वांद्रे येथील केंद्रावर दोन्ही ठाकरे बंधू योगायोगाने एकाच वेळी पोहोचल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले.

एक्झिट पोलचे अंदाज: मुंबईत महायुतीला स्पष्ट बहुमताचे संकेत?
राजकारण
१५ जाने, २०२६

एक्झिट पोलचे अंदाज: मुंबईत महायुतीला स्पष्ट बहुमताचे संकेत?

मतदानाचा कल पाहता काही खाजगी संस्थांच्या एक्झिट पोलनुसार महायुतीचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे

AD