Lokman News Logo
ताज्या बातम्या
खडू सोडून हाती बॅट, जळगावात जमणार शिक्षकांचा थाट!अमळनेर: फार्मसी महाविद्यालयात वाचन चळवळीचा जागर.ग्रंथांचे पूजन आणि प्रदर्शन!सावधान! ही सामान्य उष्णता नाही, तर 'एल निनो'ची चाहूल; जी जीवघेणी ठरू शकते.शेतकरी बापाचे 'लोटांगण' हुंड्यासाठी नाही, तर 'मुलगी द्या' या विनवणीसाठी!'सुरुंग'ने प्रस्थापित साहित्याची तटबंदी फोडणारे कवी: त्र्यंबक सपकाळे यांना अभिवादन!खडू सोडून हाती बॅट, जळगावात जमणार शिक्षकांचा थाट!अमळनेर: फार्मसी महाविद्यालयात वाचन चळवळीचा जागर.ग्रंथांचे पूजन आणि प्रदर्शन!सावधान! ही सामान्य उष्णता नाही, तर 'एल निनो'ची चाहूल; जी जीवघेणी ठरू शकते.शेतकरी बापाचे 'लोटांगण' हुंड्यासाठी नाही, तर 'मुलगी द्या' या विनवणीसाठी!'सुरुंग'ने प्रस्थापित साहित्याची तटबंदी फोडणारे कवी: त्र्यंबक सपकाळे यांना अभिवादन!खडू सोडून हाती बॅट, जळगावात जमणार शिक्षकांचा थाट!अमळनेर: फार्मसी महाविद्यालयात वाचन चळवळीचा जागर.ग्रंथांचे पूजन आणि प्रदर्शन!सावधान! ही सामान्य उष्णता नाही, तर 'एल निनो'ची चाहूल; जी जीवघेणी ठरू शकते.शेतकरी बापाचे 'लोटांगण' हुंड्यासाठी नाही, तर 'मुलगी द्या' या विनवणीसाठी!'सुरुंग'ने प्रस्थापित साहित्याची तटबंदी फोडणारे कवी: त्र्यंबक सपकाळे यांना अभिवादन!
अमळनेर

निंब येथे नंदादीप माध्यमिक विद्यालय व जि. प. मराठी शाळेचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Anil Chaudhari १२/२/२०२६
निंब येथे नंदादीप माध्यमिक विद्यालय व जि. प. मराठी शाळेचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
लोकमन न्यूज | प्रतिनिधी : अनिल चौधरी | निंब, ता. अमळनेर निंब (ता. अमळनेर) येथे दि. ११ फेब्रुवारी रोजी नंदादीप माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद मराठी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात पार पडले. या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी शहापूर केंद्राचे केंद्रप्रमुख मा. ऐ. सी. सोनवणे हे होते, तर शहापूर केंद्रशाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील सर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास नंदादीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब ए. बी. चौधरी, जि. प. मराठी शाळेचे मुख्याध्यापक परदेशी सर, गावातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. एल. डी. चौधरी, तसेच सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहसंमेलनात नंदादीप माध्यमिक विद्यालय व जि. प. मराठी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देशभक्तीपर, भक्तीपर तसेच मराठी व हिंदी चित्रपट गीतांवर आधारित नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यासोबतच समाजप्रबोधनावर आधारित नाटिका सादर करण्यात आल्या, ज्यांना उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. कार्यक्रमस्थळी गावातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच लहान मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान बालकलाकारांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व संपूर्ण स्नेहसंमेलनाचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक ऐ. जी. पाटील सर व समाधान पवार सर यांनी केले. तर राहुल पाटील सर यांनी सादर केलेल्या चुटक्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नंदादीप माध्यमिक विद्यालयाचे श्री. एस. एच. सुतार सर, शिगाणे सर, व्ही. एम. चौधरी सर, भोलेनाथ आबा चौधरी, तसेच जि. प. शाळेचे प्रमोद पवार सर यांनी विशेष परिश्रम घेतले. विशेष श्रम विलास आबा पाटील यांनी विद्यार्थ्यांची तयारी व संपूर्ण नियोजनाची जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला असून, शाळा व ग्रामस्थांमधील स्नेहभाव अधिक दृढ झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले. 💐
जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD