Lokman News
ताज्या बातम्या
तृतीयपंथी बांधवांच्या हाताला रोजगाराची ‘रिक्षा’! ज्ञान देणाऱ्या हातांचा सन्मान; समाज घडविणाऱ्या विचारांना सलाम! 🩸 श्रावण सांगतेला भक्तीला रक्तदानाची जोड; कपिलेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे आज रक्तदान शिबिर! 🌺 🌹 ‘शिक्षक’ म्हणून घडविताना समाजालाही दिशा; प्रा. हिरालाल पाटील यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव! 🌹 🌿 कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 🌿 अमळनेर बाजार समितीत सीसीआय कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू! तृतीयपंथी बांधवांच्या हाताला रोजगाराची ‘रिक्षा’! ज्ञान देणाऱ्या हातांचा सन्मान; समाज घडविणाऱ्या विचारांना सलाम! 🩸 श्रावण सांगतेला भक्तीला रक्तदानाची जोड; कपिलेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे आज रक्तदान शिबिर! 🌺 🌹 ‘शिक्षक’ म्हणून घडविताना समाजालाही दिशा; प्रा. हिरालाल पाटील यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव! 🌹 🌿 कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 🌿 अमळनेर बाजार समितीत सीसीआय कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू! तृतीयपंथी बांधवांच्या हाताला रोजगाराची ‘रिक्षा’! ज्ञान देणाऱ्या हातांचा सन्मान; समाज घडविणाऱ्या विचारांना सलाम! 🩸 श्रावण सांगतेला भक्तीला रक्तदानाची जोड; कपिलेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे आज रक्तदान शिबिर! 🌺 🌹 ‘शिक्षक’ म्हणून घडविताना समाजालाही दिशा; प्रा. हिरालाल पाटील यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव! 🌹 🌿 कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 🌿 अमळनेर बाजार समितीत सीसीआय कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू!
महाराष्ट्र

श्री गजानन महाराजांचा १४८ वा प्रगट दिन आज; सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा

लोकमन न्यूज..अनिल चौधरी ८/२/२०२६
श्री गजानन महाराजांचा १४८ वा प्रगट दिन आज; सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा
लोकमन न्यूज..अनिल चौधरी....श्री गजानन महाराजांच्या १४८ व्या प्रगट दिनानिमित्त शेगावसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये काकड आरती, महापूजा, अभिषेक, भजन-कीर्तन व प्रवचनांचे आयोजन करण्यात आले असून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित आहेत. शेगाव येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून संपूर्ण परिसर “गण गण गणात बोते”च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. या पावन दिनी महाराजांच्या शिकवणीनुसार भक्तांनी सेवाभाव, दानधर्म, अन्नदान, रक्तदान तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून आपली श्रद्धा व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी धार्मिक मिरवणुका, कीर्तन-प्रवचनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या शुभप्रसंगी सर्व श्री गजानन महाराज भक्तांना हार्दिक शुभेच्छा. अनंत कोटी ब्रह्मांडनायक, महाराजाधिराज, योगिराज, परब्रह्म सच्चिदानंद, भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय! जय जय रघुवीर समर्थ!
जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD