Lokman News Logo
ताज्या बातम्या
जळगावात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे? प्रशासनाला निष्पाप बळी जाण्याची प्रतीक्षा आहे का?'जसा मित्र तसे संस्कार'कर्णाची निष्ठा, सुदाम्याचे प्रेम आणि श्रीकृष्णाची साथ; असा असावा जीवनातील खरा मित्र!वारकरी आणि सुसंस्कृत विचारांचा वारसा! निंबच्या पाटील परिवारातर्फे अण्णासाहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य कीर्तन.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात! निंबच्या ९ वर्षीय केदारेश्वरची पखवाजावर लक्षवेधी जादूतरुणाईसाठी मांडळ गावाची साद: 'आई-वडील समजून घ्या...'संस्कारांसाठी बदलला बाजाराचा दिवस!जळगावात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे? प्रशासनाला निष्पाप बळी जाण्याची प्रतीक्षा आहे का?'जसा मित्र तसे संस्कार'कर्णाची निष्ठा, सुदाम्याचे प्रेम आणि श्रीकृष्णाची साथ; असा असावा जीवनातील खरा मित्र!वारकरी आणि सुसंस्कृत विचारांचा वारसा! निंबच्या पाटील परिवारातर्फे अण्णासाहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य कीर्तन.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात! निंबच्या ९ वर्षीय केदारेश्वरची पखवाजावर लक्षवेधी जादूतरुणाईसाठी मांडळ गावाची साद: 'आई-वडील समजून घ्या...'संस्कारांसाठी बदलला बाजाराचा दिवस!जळगावात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे? प्रशासनाला निष्पाप बळी जाण्याची प्रतीक्षा आहे का?'जसा मित्र तसे संस्कार'कर्णाची निष्ठा, सुदाम्याचे प्रेम आणि श्रीकृष्णाची साथ; असा असावा जीवनातील खरा मित्र!वारकरी आणि सुसंस्कृत विचारांचा वारसा! निंबच्या पाटील परिवारातर्फे अण्णासाहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य कीर्तन.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात! निंबच्या ९ वर्षीय केदारेश्वरची पखवाजावर लक्षवेधी जादूतरुणाईसाठी मांडळ गावाची साद: 'आई-वडील समजून घ्या...'संस्कारांसाठी बदलला बाजाराचा दिवस!
महाराष्ट्र

'जसा मित्र तसे संस्कार'कर्णाची निष्ठा, सुदाम्याचे प्रेम आणि श्रीकृष्णाची साथ; असा असावा जीवनातील खरा मित्र!

लोकमन न्यूज..अनिल चौधरी ७/४/२०२६
'जसा मित्र तसे संस्कार'कर्णाची निष्ठा, सुदाम्याचे प्रेम आणि श्रीकृष्णाची साथ; असा असावा जीवनातील खरा मित्र!
🤝 मैत्रीबंध

"जसा मित्र तसे संस्कार" या उक्तीप्रमाणे, जीवनात एका प्रामाणिक मित्राचे महत्त्व अनमोल असते. तो आपल्या मनातील गुपितं आणि सुख-दुःख वाटून घेणारा जिवलग सोबती असतो, जो आयुष्याच्या युद्धात विजयाचा मार्ग प्रशस्त करतो.

(लोकमन न्यूज़: अनिल चौधरी, निंब) अमळनेर / निंब: 'जसा मित्र तसे संस्कार' असे आपल्याकडे म्हटले जाते. आयुष्यात एकच दोस्त असावा, पण तो प्रामाणिक आणि जिवलग असावा. असा एक खरा मित्र हजार शत्रूंना भारी पडतो. मानसशास्त्रानुसार, मूल जेव्हा सहा वर्षांचे होते, तेव्हा ते आईपासून थोडे दूर जाते आणि याच टप्प्यावर त्याची ओळख 'मित्र' नावाच्या सवंगड्याशी होते. आई-वडील आणि शिक्षकांनंतर ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास टाकला जातो, ती व्यक्ती म्हणजे मित्र किंवा सखा! माणूस आपल्या मनातल्या गुपित आणि विश्वसनीय गोष्टी जेवढ्या मोकळेपणाने मित्राजवळ बोलतो, तेवढ्या तो कुठेही बोलू शकत नाही. खरा मित्र मिळाला तर तो आयुष्यात एका गुणकारी औषधासारखे काम करतो.

खरा आणि प्रामाणिक मित्र मिळणे हे भाग्याचेच असते. दोस्त म्हणजे मनातील सर्व भावना, सुख-दुःख व्यक्त करण्याची हक्काची जागा. आपल्या संस्कृतीत मैत्रीची अनेक महान उदाहरणे आहेत.

मैत्रीची महान उदाहरणे: निष्ठा आणि निस्वार्थता

मित्र असावा तर तो कर्णासारखा! कर्णाला माहीत होते की युद्धात पांडवांचाच विजय होणार आहे आणि आपला मृत्यू निश्चित आहे, तरीही एकवचनी राहून मित्राचे रक्षण करणे हाच त्याने आपला धर्म मानला. मित्र असावा तर सुदाम्यासारखा; जो अत्यंत गरीब असूनही त्याच्या मनात श्रीमंतीचा किंवा संपत्तीचा कोणताही लोभ नव्हता, त्याला ध्यास होता तो फक्त आपल्या मित्राला भेटण्याचा. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मैत्री असावी तर साक्षात भगवान श्रीकृष्णासारखी! जर आयुष्यात श्रीकृष्णासारखा सखा आणि मार्गदर्शक मिळाला, तर जीवनाच्या युद्धात तुमचा विजय निश्चित असतो.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मित्राची साथ: काय जोडावे, काय टाळावे!

वयाच्या सहाव्या वर्षापासून ते लग्नापर्यंत आणि अनेकदा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जीवनातील चांगल्या-वाईट प्रसंगांत मित्राची साथ अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे स्वार्थी मित्रांपासून दूर राहा आणि चांगले मित्र जोडा. मैत्री अशी करा की ज्याचा इतिहास घडला पाहिजे आणि ती इतरांसाठी एक 'मिसाल' (उदाहरण) बनली पाहिजे.

📌 खऱ्या मैत्रीचे स्तंभ:

  • खऱ्या मैत्रीमध्ये पैसा, मालमत्ता यांना थारा नसतो.
  • राग, द्वेष, लोभ, मद (अहंकार) आणि मत्सर या विकारांपासून ती दूर असते.
  • ती केवळ निखळ प्रेम आणि निखळ आनंद आहे.

बंधूंनो, म्हणूनच आयुष्यात खरे मित्र ओळखा. मैत्री जपून करा आणि त्यापेक्षा ती जास्त प्रामाणिकपणे सांभाळा. कारण एक चांगला मित्र तुमचे जीवन घडवू शकतो, तर एक चुकीचा मित्र ते उध्वस्तही करू शकतो. सरतेशेवटी, दोस्ती म्हणजे केवळ स्वार्थ नसून ते एक निखळ प्रेम आणि निखळ आनंद आहे!

जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD