Lokman News
ताज्या बातम्या
मराठी माध्यमातून घेतली भरारी, सुयोग पाटील आता DRDO चे अधिकारी!विठ्ठल अनमुलवाड यांचा नाशिकमध्ये बहुमान; परभणी जिल्ह्याची वाढवली शान!कंत्राट वाटपात नातेसंबंधांचा खेळ; मनसे म्हणे, आता चौकशीची आलीय वेळ!सेवा केली प्रामाणिक आणि चोख; संजय पाटलांच्या सोहळ्यास जमले अनेक लोक! "सुषमाताईंची लाट, मालुताईंची साथ; महिला शक्तीने गाजवला विजयाचा थाट!"मराठी माध्यमातून घेतली भरारी, सुयोग पाटील आता DRDO चे अधिकारी!विठ्ठल अनमुलवाड यांचा नाशिकमध्ये बहुमान; परभणी जिल्ह्याची वाढवली शान!कंत्राट वाटपात नातेसंबंधांचा खेळ; मनसे म्हणे, आता चौकशीची आलीय वेळ!सेवा केली प्रामाणिक आणि चोख; संजय पाटलांच्या सोहळ्यास जमले अनेक लोक! "सुषमाताईंची लाट, मालुताईंची साथ; महिला शक्तीने गाजवला विजयाचा थाट!"मराठी माध्यमातून घेतली भरारी, सुयोग पाटील आता DRDO चे अधिकारी!विठ्ठल अनमुलवाड यांचा नाशिकमध्ये बहुमान; परभणी जिल्ह्याची वाढवली शान!कंत्राट वाटपात नातेसंबंधांचा खेळ; मनसे म्हणे, आता चौकशीची आलीय वेळ!सेवा केली प्रामाणिक आणि चोख; संजय पाटलांच्या सोहळ्यास जमले अनेक लोक! "सुषमाताईंची लाट, मालुताईंची साथ; महिला शक्तीने गाजवला विजयाचा थाट!"
अमळनेर

मराठी माध्यमातून घेतली भरारी, सुयोग पाटील आता DRDO चे अधिकारी!

लोकमन न्यूज..अनिल चौधरी ३/६/२०२६
मराठी माध्यमातून घेतली भरारी, सुयोग पाटील आता DRDO चे अधिकारी!
मराठी माध्यमातून थेट DRDO चे सायंटिस्ट! अमळनेरच्या सुयोग पाटीलची गरुडभरारी अमळनेर :(प्रतिनिधी, लोकमन न्यूज) : "जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण मेहनत आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नसते." हे वाक्य अमळगाव (ता. अमळनेर) येथील सुयोग हरेश पाटील या युवकाने प्रत्यक्ष करून दाखवले आहे. मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या सुयोगची देशाच्या प्रतिष्ठित 'संरक्षण संशोधन व विज्ञान संस्थेत' (DRDO) Scientist (Class-1 Gazetted Post) पदावर निवड झाली आहे. एका सामान्य ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या युवकाने थेट देशाच्या संरक्षण क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून मिळवलेल्या या बहुमानामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून सुयोगवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 🔴 अपयशाने न खचता इंजिनिअरिंग पूर्ण सुयोग पाटील यांचे प्राथमिक शिक्षण अमळगाव येथे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झाले. पुढील माध्यमिक शिक्षण अमळनेर येथील जी. एस. हायस्कूलमध्ये, तर उच्च माध्यमिक शिक्षण प्रताप महाविद्यालयात पूर्ण झाले. बारावीच्या परीक्षेत त्यांना ६३ टक्के गुण मिळाले. गुण कमी असल्यामुळे तसेच CET व JEE परीक्षांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. मात्र, या अपयशाने खचून न जाता त्यांनी शिरपूर येथील 'आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'मधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी २०२० मध्ये यशस्वीरीत्या पूर्ण केली. 🔴 खासगी नोकरी आणि मॅनेजर पदाचा त्याग पदवी पूर्ण झाल्यानंतर २०२१ ते २०२४ या काळात सुयोग यांनी खासगी क्षेत्रात (IT Sector) नोकरी केली. नोकरी सांभाळत त्यांनी 'GATE' परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात देशभरातून सुमारे ३००० वा क्रमांक मिळाला. परंतु, यावर समाधान न मानता त्यांनी पूर्णवेळ अभ्यास करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि चांगली नोकरी सोडली. दरम्यान, जानेवारी २०२५ मध्ये त्यांची 'पंजाब अँड सिंध बँकेत' मॅनेजर पदावर निवड झाली होती. ही मोठी संधी समोर असतानाही, आपले अंतिम ध्येय विसरू न देता त्यांनी बँकेची नोकरी नाकारली आणि अभ्यास सुरूच ठेवला. 🔴 १.७ लाख विद्यार्थ्यांमधून मिळवला ४६० वा रँक फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या 'GATE CS' परीक्षेत देशभरातून सुमारे १ लाख ७० हजार विद्यार्थी बसले होते. या अटीतटीच्या परीक्षेत सुयोगने अखिल भारतीय पातळीवर ४६० वा क्रमांक (AIR 460) मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. 🔴 कठीण मुलाखतीनंतर 'शास्त्रज्ञ' पदावर मोहर या यशाच्या जोरावर त्यांनी DRDO च्या 'Scientist-B' पदासाठी अर्ज केला. देशभरातून निवडक ३५० उमेदवारांना दिल्ली येथे मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले होते. IIT चे नामवंत प्राध्यापक, देशातील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पॅनेलसमोर सुयोग यांची कठीण मुलाखत झाली. या मुलाखतीत सुयोगने आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची छाप पाडत यश मिळवले. जानेवारी २०२६ मध्ये त्यांची 'Class-1 Gazetted' शास्त्रज्ञ पदासाठी अंतिम निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. येत्या जुलै २०२६ मध्ये ते DRDO मध्ये अधिकृतपणे शास्त्रज्ञ म्हणून रुजू होणार आहेत. 🔴 बन्सीलाल पॅलेस येथे जंगी सत्कार सुयोगच्या या ऐतिहासिक यशाबद्दल अमळनेर येथील 'बन्सीलाल पॅलेस' येथे एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एल. ए. पाटील होते. त्यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना DRDO मधील शास्त्रज्ञ पदाचे महत्त्व आणि सुयोगच्या संघर्षमय प्रवासाचा गौरव केला. 🔴 कौटुंबिक पार्श्वभूमी सुयोग पाटील हे दहिवद येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. हरेश नामदेव पाटील व भूमी अभिलेख कार्यालय (अमळनेर) येथील सौ. सुनंदा हरेश पाटील यांचे सुपुत्र आहेत. तसेच जी. एस. हायस्कूलचे माजी उपमुख्याध्यापक श्री. सी. एस. पाटील सर व जळगाव जिल्हा पतंजली महामंत्री सौ. ज्योती चंद्रकांत पाटील यांचे ते जावई आहेत. प्रेरणादायी संदेश: मराठी माध्यमात शिकून, १२ वीला अवघे ६३ टक्के असताना आणि सुरुवातीला स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आलेले असतानाही, केवळ स्वतःच्या कष्टावर देशातील सर्वोच्च संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ पदापर्यंत पोहोचलेला सुयोगचा हा प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरत आहे.
जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD