Lokman News Logo
ताज्या बातम्या
भोंदूगिरीचा बुरखा फाटला: अंधश्रद्धा इज्जत लुटते, तर विज्ञान इज्जत देते!गुरुजी, उठा आणि सज्ज व्हा: समाजाला पुन्हा तुमची गरज आहे!नाहीतर 'AI गुरुजी' तुमची जागा घेतील!धन्य ते कोकणवासी आणि त्यांची तऱ्हाच न्यारी! नागोठणे ते श्रीवर्धन प्रवासात गवसली माणुसकीची श्रीमंतीगरताड येथे खानदेशातील तिसरा मोठा भक्तीसोहळा: अखंड ७७ व्या हरिनाम सप्ताहाची नांदी.अमळनेरकरांच्या आरोग्याशी खेळ! शहरात डासांचा भयंकर त्रास, प्रशासन मात्र सुस्त.भोंदूगिरीचा बुरखा फाटला: अंधश्रद्धा इज्जत लुटते, तर विज्ञान इज्जत देते!गुरुजी, उठा आणि सज्ज व्हा: समाजाला पुन्हा तुमची गरज आहे!नाहीतर 'AI गुरुजी' तुमची जागा घेतील!धन्य ते कोकणवासी आणि त्यांची तऱ्हाच न्यारी! नागोठणे ते श्रीवर्धन प्रवासात गवसली माणुसकीची श्रीमंतीगरताड येथे खानदेशातील तिसरा मोठा भक्तीसोहळा: अखंड ७७ व्या हरिनाम सप्ताहाची नांदी.अमळनेरकरांच्या आरोग्याशी खेळ! शहरात डासांचा भयंकर त्रास, प्रशासन मात्र सुस्त.भोंदूगिरीचा बुरखा फाटला: अंधश्रद्धा इज्जत लुटते, तर विज्ञान इज्जत देते!गुरुजी, उठा आणि सज्ज व्हा: समाजाला पुन्हा तुमची गरज आहे!नाहीतर 'AI गुरुजी' तुमची जागा घेतील!धन्य ते कोकणवासी आणि त्यांची तऱ्हाच न्यारी! नागोठणे ते श्रीवर्धन प्रवासात गवसली माणुसकीची श्रीमंतीगरताड येथे खानदेशातील तिसरा मोठा भक्तीसोहळा: अखंड ७७ व्या हरिनाम सप्ताहाची नांदी.अमळनेरकरांच्या आरोग्याशी खेळ! शहरात डासांचा भयंकर त्रास, प्रशासन मात्र सुस्त.
ताज्या बातम्या

गुरुजी, उठा आणि सज्ज व्हा: समाजाला पुन्हा तुमची गरज आहे!नाहीतर 'AI गुरुजी' तुमची जागा घेतील!

लोकमन न्यूज..अनिल चौधरी २७/३/२०२६
गुरुजी, उठा आणि सज्ज व्हा: समाजाला पुन्हा तुमची गरज आहे!नाहीतर 'AI गुरुजी' तुमची जागा घेतील!
🔔 शिक्षकांना आवाहन

संपादकीय : 'मम्मी'त हरवली आई, आणि 'सर'च्या दुनियेत हरपले 'गुरुजी': शिक्षकांनो, आता तरी जागे व्हा!

अनिल चौधरी, निंब (लोकमन न्यूज प्रतिनिधी)

आधुनिकतेच्या प्रवाहात 'मम्मी'च्या झगमगाटात आई हरवली, तद्वतच 'सर'च्या व्यावसायिकतेमुळे पारंपरिक 'गुरुजी' लोप पावत आहेत. शिक्षण क्षेत्रातील हे गंभीर आव्हान स्वीकारून शिक्षकांनी अहंकार सोडून पुन्हा एकदा समाज घडवण्यासाठी जागे व्हावे, असे आवाहन लोकमन न्यूज करत आहे.

एक अणुबॉम्बपेक्षा प्रचंड ताकद असलेला, लाव्हारसासारखा शक्तिशाली आणि आई-वडिलांनंतर जीवनात सर्वोच्च स्थानावर असलेला आपला गुरुजी आज कुठे गेला? हा प्रश्न आजचे समाजमन आणि लोकमन विचारत आहे. जसे 'मम्मी' या आधुनिक शब्दाच्या झगमगाटात आपली साधीभोळी 'आई' कुठेतरी हरवली, अगदी तसेच 'सर' या व्यावसायिक शब्दामुळे हातात छडी घेऊन विद्यार्थ्यांवर मायेची पाखर घालणारा आणि वेळप्रसंगी योग्य वळण लावणारा 'गुरुजी' आज हद्दपार झाला आहे.

बदलत्या काळाचा फटका आणि हरवलेला आदर

ज्या दिवशी आपल्या समाजातून आणि वर्गावर्गातून हा छडी घेतलेला गुरुजी हद्दपार झाला, तेव्हापासून समाजाची आणि नव्या पिढीची काय अवस्था झाली आहे, हे आपल्या सर्वांच्या उघड्या डोळ्यांसमोर आहे. आजचा जमाना फॅशनचा आहे, आधुनिकतेचा आहे. 'अपडेट' राहण्याच्या या नादात समाज पूर्णपणे बदलून गेला आहे. समाजातील सर्वोच्च आणि आदरणीय पदावर असलेले 'गुरुजी' हे स्थान आज कालबाह्य होत आहे की काय, अशी रास्त भीती वाटू लागली आहे. आज कुणी कुणाचे ऐकण्यास तयार नाही. शासनाच्या धोरणांमधील वारंवार होणारे प्रयोग आणि नव्या शिक्षणपद्धतींमुळे खऱ्या अर्थाने ज्ञान देणारा गुरुजी पूर्णतः हरवलेला दिसतो.

अहंकार सोडा, पिढी घडवा!

पण अजूनही वेळ पूर्णपणे गेलेली नाही. ज्या दिवशी सुप्त अवस्थेत गेलेला, अंतर्मनाने झोपलेला गुरुजी खऱ्या अर्थाने आणि मनापासून जागा होईल, त्या दिवशी हे संपूर्ण जग बदलण्याची ताकद त्याच्यात नक्कीच आहे. त्यासाठी शासनाने, समाजाने आणि स्वतः झोपेचे सोंग घेतलेल्या गुरुजींनी स्वतःला एक संधी दिली पाहिजे.

सर्व शिक्षक मंडळींना ही कळकळीची विनंती आहे की, आज, आता आणि ताबडतोब आपला अहंकार सोडा. आपापसातील हेवेदावे आणि राजकारण बाजूला ठेवा. एक आदर्श समाज आणि सुसंस्कृत पिढी घडवण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त तुमच्यातच आहे. उठा आणि सज्ज व्हा! 'माझी संस्था, माझी शाळा' या संकुचित विचारांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या मुलासारखे माना. नुसते बोलून चालणार नाही, तर तशी कृती करा. आपण आपल्या घरातील परिवारासाठी जशी जीव ओतून मेहनत करतो, तशीच मेहनत या विद्यार्थ्यांसाठी घ्या.

शाळा हे मंदिर आणि विद्यार्थी हाच देव

आपण हे ज्ञानदानाचे काम मोफत करत नाही आहोत, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. शासन आणि समाज आपल्याला या कामाचा योग्य तो मोबदला (पगार) देत आहे. त्यामुळे किमान आपल्या आदर्श पिढीसाठी प्रामाणिकपणे फक्त वीस टक्के तरी जास्तीची मेहनत घ्या. मग पाहा, आपला समाज कसा बदलतो! शाळा हे एक मंदिर आहे आणि त्यातील विद्यार्थी हे प्रत्यक्ष देवाचे रूप आहेत. मानले तर देव, नाहीतर दगड. या देवपूजेसाठी तुम्हाला वेगळे पैसे लागणार नाहीत. फक्त एकजुटीने 'विद्यार्थी विकास, विकास आणि विकास' हे एकच ध्येय बनवा. आज गुरुजी या शब्दाची महती थोडी कमी झाली असेलही, पण ती पुन्हा मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न तर आपण करू शकतो.

📌 महत्त्वाचे मुद्दे:

  • आपला अहंकार सोडा आणि आपापसातील हेवेदावे विसरा.
  • शाळा हे मंदिर आणि विद्यार्थी हेच देव मानून प्रामाणिकपणे कष्ट घ्या.
  • 'माझी संस्था' या संकुचित विचारांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचे मूल समजा.
  • 'विद्यार्थी विकास' हेच एकमेव ध्येय ठेवा.
  • कृत्रिम बुद्धिमत्तेचा 'AI गुरुजी' तुमची जागा घेण्यापूर्वी जागे व्हा.

वेळ संपण्यापूर्वी जागे व्हा, अन्यथा 'AI' जागा घेईल

चला, पुन्हा एकदा 'गुरुजी'चे अस्तित्व सिद्ध करूया. लोप पावणारी संस्कृती आणि संस्कार पुन्हा रुजवण्यासाठी सज्ज होऊया. आता तुम्हाला तयार व्हावेच लागेल! कारणे सांगणे आणि पळवाटा शोधणे बंद करा. जर तुम्ही आता बदलला नाहीत, तर लक्षात ठेवा, येणारा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे आणि तुमच्यात असलेली माया व भावना नसलेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा 'AI गुरुजी' तुमची जागा घ्यायला मागेपुढे पाहणार नाही.

समाजातील या 'गुरुजी' शब्दाची ताकद ओळखा. आपण सर्व मिळून हे विश्व नक्कीच बदलू शकतो. मनात कोणतीही नकारात्मकता (Negative विचार) न ठेवता सकारात्मकतेने पुढे जा. मग पाहा तुमची ताकद काय आहे ते! आजच मनाशी एकजुटीने ठाम निर्णय घेऊया की, "आम्हाला फक्त आणि फक्त एक आदर्श पिढी घडवायची आहे, म्हणजे घडवायचीच आहे!"

जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD