Lokman News Logo
ताज्या बातम्या
भोंदूगिरीचा बुरखा फाटला: अंधश्रद्धा इज्जत लुटते, तर विज्ञान इज्जत देते!गुरुजी, उठा आणि सज्ज व्हा: समाजाला पुन्हा तुमची गरज आहे!नाहीतर 'AI गुरुजी' तुमची जागा घेतील!धन्य ते कोकणवासी आणि त्यांची तऱ्हाच न्यारी! नागोठणे ते श्रीवर्धन प्रवासात गवसली माणुसकीची श्रीमंतीगरताड येथे खानदेशातील तिसरा मोठा भक्तीसोहळा: अखंड ७७ व्या हरिनाम सप्ताहाची नांदी.अमळनेरकरांच्या आरोग्याशी खेळ! शहरात डासांचा भयंकर त्रास, प्रशासन मात्र सुस्त.भोंदूगिरीचा बुरखा फाटला: अंधश्रद्धा इज्जत लुटते, तर विज्ञान इज्जत देते!गुरुजी, उठा आणि सज्ज व्हा: समाजाला पुन्हा तुमची गरज आहे!नाहीतर 'AI गुरुजी' तुमची जागा घेतील!धन्य ते कोकणवासी आणि त्यांची तऱ्हाच न्यारी! नागोठणे ते श्रीवर्धन प्रवासात गवसली माणुसकीची श्रीमंतीगरताड येथे खानदेशातील तिसरा मोठा भक्तीसोहळा: अखंड ७७ व्या हरिनाम सप्ताहाची नांदी.अमळनेरकरांच्या आरोग्याशी खेळ! शहरात डासांचा भयंकर त्रास, प्रशासन मात्र सुस्त.भोंदूगिरीचा बुरखा फाटला: अंधश्रद्धा इज्जत लुटते, तर विज्ञान इज्जत देते!गुरुजी, उठा आणि सज्ज व्हा: समाजाला पुन्हा तुमची गरज आहे!नाहीतर 'AI गुरुजी' तुमची जागा घेतील!धन्य ते कोकणवासी आणि त्यांची तऱ्हाच न्यारी! नागोठणे ते श्रीवर्धन प्रवासात गवसली माणुसकीची श्रीमंतीगरताड येथे खानदेशातील तिसरा मोठा भक्तीसोहळा: अखंड ७७ व्या हरिनाम सप्ताहाची नांदी.अमळनेरकरांच्या आरोग्याशी खेळ! शहरात डासांचा भयंकर त्रास, प्रशासन मात्र सुस्त.
महाराष्ट्र

भोंदूगिरीचा बुरखा फाटला: अंधश्रद्धा इज्जत लुटते, तर विज्ञान इज्जत देते!

लोकमन न्यूज..अनिल चौधरी २७/३/२०२६
भोंदूगिरीचा बुरखा फाटला: अंधश्रद्धा इज्जत लुटते, तर विज्ञान इज्जत देते!
🚨 महत्त्वाचे धडे

पैशाने आमदार-मंत्री होता येतं, पण अक्कल विकत मिळत नाही; भोंदू खरात प्रकरणाचे ७ जळजळीत धडे!

(लोकमन न्यूज प्रतिनिधी - अनिल चौधरी, निंब)

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या उच्चभ्रूंचा मुखवटा फाडला आहे.
पैशाने सर्व काही विकत घेता येते, पण अक्कल नाही; या प्रकरणातून समाजाने शिकायचे आहेत हे ७ 'जळजळीत' धडे!

अमळनेर/नाशिक: नाशिक येथील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याला एक मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणातून समाजातील तथाकथित उच्चभ्रू, प्रतिष्ठित आणि सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांचा बुरखा फाटला आहे. या संपूर्ण प्रकरणातून सर्वसामान्य जनतेने आणि समाजाने काही कटू पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याची गरज निर्माण झाली आहे. 'देखी शिखी लीया जोग, घटे काया बढे रोग' - एक जसे करतो तसेच आपण करू नये, नाहीतर फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. या उक्तीस साजेसे कार्य समाजातील काही वर्ग एकमेकांचे पाहून आचरण करत असतात, जसे मेंढ्या एक गेली की दुसरी, तिसरी मग सगळे.

१. सामान्यांनो, भोंदूंच्या नादी लागू नका!

ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे आणि ज्यांना तो कुठे खर्च करावा हे समजत नाही, त्यांनी खुशाल अशा महागड्या बाबा-बुवांकडे जावे. त्यांचे तथाकथित 'तीर्थ' किंवा लघवी प्यावी आणि आपण खूप मोठे अध्यात्मिक असल्याचे सोंग करावे. पण, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी अशा भोंदूंच्या नादी अजिबात लागू नये. दहा रुपयांचा अगरबत्तीचा पुडा आणावा आणि आपल्या घरच्याच देव्हाऱ्यातल्या देवाची मनोभावे पूजा करावी, त्यातच खरे समाधान आणि पुण्य आहे.

२. विज्ञान इज्जत देते, अंधश्रद्धा इज्जत लुटते

समाजातील सर्व माता-भगिनींनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्याऐवजी विज्ञानाची कास धरा. खरात प्रकरणाने हे सिद्ध केले आहे की, अंधश्रद्धा तुमची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक इज्जत लुटते, तर विज्ञान तुम्हाला सन्मानाने जगायला शिकवते. आपल्या अडचणींवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय शोधल्यास केवळ समस्या सुटत नाहीत, तर समाजात तुमचा मानही वाढतो.

३. कार्यकर्त्यांनो, तुमचे 'भाऊ-दादा' बाबांच्या दरबारात काय करतात ते पहा!

हा सर्वात मोठा धडा त्या कार्यकर्त्यांसाठी आहे, जे घरदार सोडून, स्वतःचे कामधंदे सोडून नेत्यांचे स्टेट्स ठेवतात. ज्यांना ते 'भाऊ, दादा, नाना, अण्णा, तात्या' म्हणून डोक्यावर घेतात, त्यांच्या प्रचारसभांमध्ये स्वतःची लाज गहाण ठेवून सतरंज्या उचलतात... हेच मोठे नेते गुपचूप जाऊन अशोक खरातसारख्या भोंदू बाबांच्या पायावर लोळतात आणि त्यांचे 'ओशनोजल' पितात. कार्यकर्त्यांनी आता डोळे उघडण्याची वेळ आली आहे. तुमचा नेता कोणत्या मार्गाने जातो, याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.

४. पदाचा आणि बुद्धीचा काहीही संबंध नसतो

भोंदू खरात प्रकरणावरून एक गोष्ट लख्खपणे स्पष्ट झाली आहे की, एखादी व्यक्ती आमदार, खासदार, मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी किंवा त्यांची बायको आहे, म्हणजे त्यांच्याकडे अक्कल असतेच असे अजिबात नाही. बुद्धिमत्ता आणि पद यांचा काहीही संबंध उरलेला नाही. उलट, अनेकदा उच्च पदावर असूनही लोक किती अज्ञानी आणि अंधश्रद्ध असू शकतात, हेच या प्रकरणाने दाखवून दिले आहे.

५. अक्कल बाजारात विकत मिळत नाही

पैशाच्या जोरावर जगात आजकाल सर्व काही विकत घेता येते. पैशाने मोठे शिक्षण घेता येते, पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर आमदार, खासदार किंवा मंत्री होता येते; पण 'अक्कल' बाजारात विकत घेता येत नाही, हेच या उच्चभ्रू लोकांच्या कृतीतून सिद्ध झाले आहे. शिक्षण, पद किंवा संपत्तीने माणूस ज्ञानी होतोच असे नाही, तर योग्य विचार आणि विवेकबुद्धीच खरी 'अक्कल' ठरते.

६. मूळ कर्तव्याचा विसर आणि घटनात्मक मूल्यांची पायमल्ली

आजकाल माध्यम समूहांनी खऱ्या बातम्या शोधून जनतेसमोर आणण्याचे आपले मूळ काम सोडून दिले आहे. त्याऐवजी 'पादुका दर्शन', 'भक्ती संगम' वगैरे उपक्रम राबवण्यात ते धन्यता मानत आहेत. लोकप्रतिनिधींनी विकासकामे करण्याऐवजी सर्वधर्मीय देवस्थानांच्या यात्रा घडवण्याचे 'इव्हेंट' सुरू केले आहेत. शैक्षणिक संस्थांनी विज्ञानाचा प्रसार करण्याऐवजी धार्मिक उपक्रम राबवणे सुरू केले आहे. ही सर्व एकाच आजाराची गंभीर लक्षणे आहेत. 'धर्म ही पूर्णपणे खाजगी बाब आहे आणि सार्वजनिक किंवा प्रशासकीय व्यवहारात त्याला कोणतेही स्थान नाही,' या आपल्या देशाच्या मूळ घटनात्मक तत्त्वापासून आपण अक्षम्यरीत्या दूर ढकलले जात आहोत, याचाच हा ज्वलंत पुरावा आहे.

७. जे निःशुल्क आहे, तेच सर्वात मौल्यवान!

शेवटी मानवाने एक गोष्ट कायम ध्यानात ठेवली पाहिजे: जगात ज्या गोष्टी निसर्गाने आपल्याला पूर्णपणे 'निःशुल्क' (Free) दिल्या आहेत, त्याच सर्वात जास्त मौल्यवान आणि महत्त्वाच्या आहेत. शांत झोप, मनाची शांती, खरा आनंद, शुद्ध हवा, पाणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले श्वास! हे कोणत्याही भोंदू बाबाच्या दरबारात विकत मिळत नाही, ते आपल्याच आत दडलेले आहे. आत्मचिंतन करून या मूल्यांची जोपासना करणे हेच खऱ्या अर्थाने अध्यात्म आहे.

जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD